मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जंगलात राहून सुचली आयडिया, मोह आणि मशरूम पासून चक्क बनवले बिस्कीट, VIDEO

जंगलात राहून सुचली आयडिया, मोह आणि मशरूम पासून चक्क बनवले बिस्कीट, VIDEO

गोंदिया जिल्ह्यातील आयेशा उईके या महिलेने मोह आणि मशरूम पासून बिस्कीट तयार केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक 18 नोव्हेंबर : आयुर्वेदामध्ये मोह आणि मशरूमला चांगल महत्व आहे आणि तेच महत्व लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यातील आयेशा उईके या महिलेने मोह आणि मशरूम पासून बिस्कीट तयार केले आहेत. या बिस्कीटला सद्या चांगली मागणी मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात या बिस्कीटला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. चला तर या मोह मशरूम बिस्कीटाची सुरुवात कशी झाली जाणून घेऊया.

आयेशा उईके या मूळच्या गोंदिया जिल्ह्यातील सालकेसा जांभडी येथील रहिवासी आहेत. आयेशा यांचं लग्न झाल्यानंतर त्या घर आणि आपला संसार यातच रमल्या होत्या .मात्र, आपण काही तरी करावं,स्वतःच्या पायावर उभ राहाव म्हणून त्या नेहमी विचार करत असत. पदवीधर असताना आपण फक्त संसारात पूर्ण वेळ घालवन त्यांना योग्य वाटत नव्हत. त्यानंतर त्यांनी विचार केला की आपण जंगलात राहतो आणि या जंगलातील अशा अनेक वनस्पती आहेत. की त्या आयुर्वेदासाठी खूप उपयोगी आहेत. त्यानंतर त्यांनी मोह आणि मशरूमच महत्व त्याचे फायदे तोटे याचा अभ्यास केला आणि मग त्यांना समजलं की यामध्ये माणसाच्या शरीरासाठी पौष्टीक असणारे अनेक घटक आहेत. काही जण मशरूमची भाजी करून खातात.

कागदी लगद्यातून क्रांती करणारा कलाकार, Video पाहून बसणार नाही डोळ्यांना विश्वास!

आपण बिस्कीट तयार करू जे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच जण खातील आणि त्यांच्या आरोग्यासाठी ते चांगल असेल. बिस्कीट तयार करायला सुरुवात केल्यानंतर अगोदर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर आदिवासी विभागाच्या वतीने त्याच प्रशिक्षण ही घेतल आणि अगदी चांगल बिस्कीट बनवलं जाऊ लागलं. बघता बघता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यवसायिक आयेशा उईके यांनी दिली आहे.

इथे संपर्क केल्यास मिळतील ही बिस्कीट

आयेशा उईकेमु. जांभडी ,पो. सालेकसा, जि.गोंदिया अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक - 9764765441

इतर बिस्कीट पेक्षा या बिस्कीटची किंमत थोडी जास्त आहे.12 बिस्कीट 50 रुपयांना विकली जातात.

Nashik : झणझणीत मिसळसह खा भजे, नाशिकमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, Video

मोह आणि मशरूमचे काय आहेत फायदे ?

मशरूम हे शरिरासाठी गुणकारी आहे. प्रथीने,जीवनसत्वे त्यात आहेत. शरीरातील पेशींची दुरुस्ती ही मशरूम करते. तसेच मायक्रोबियल आणि इतर फंगल इन्फेक्शन देखील बरे होते. हृदयाला देखील फायदेशीर असते. तसेच मोहापासून सर्दी खोकला बरा होतो. त्यात ही पौष्टीक गुणधर्म असतात.

या व्यवसायासाठी पतीचा मिळाला चांगला आधार

आपण कोणतही काम करताना आपल्या पतीची साथ ही खूप मोलाची असते. माझ्या पतीला मी या व्यवसायाबद्दल सांगताच त्यांनी आधार दिला आणि करण्यास होकार दिला म्हणून हे सर्व शक्य झालं आहे.आज मी स्वतःच्या पायावर उभी राहून दोन पैसे कमवत आहे. याचा मला आनंद वाटतो. महिलांनी फक्त चूल आणि मूल यातच न गुंतून राहता काही तरी व्यवसाय केला पाहिजे. त्यासाठी मेहनत करण्याची जिद्द आली पाहिजे, नक्की आपण यश संपादित करू,  असं आयेशा उईके सांगतात.

First published:

Tags: Local18, Nashik