मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिकमधील खळबळजनक प्रकार, प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिकमधील खळबळजनक प्रकार, प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

महिलेचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते आणि याबाबतची कुणकुण तिच्या डॉक्टर पतीला लागली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  News18 Desk

नाशिक, 25 सप्टेंबर : अनैतिक संबंधातून हत्येच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. याप्रकाराशी संबंधित एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. पत्नीने आपल्याच डॉक्टर पतीला अनैतिक संबंधातून आपल्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन टोचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातीलच एका खोलीत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रविवारी ही धक्कादायक उघडकीस आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

नाशिक येथील एका खासगी रुग्णालयातील 45 वर्षीय पीडित डॉक्टरला त्याच्या 40 वर्षीय पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून संगनमताने रुग्णालयात बोलावले आणि याठिकाणी वाद घातला. यानंतर डॉक्टरला दोघांनी मिळून रुग्णालयातीलच एका खोलीत डांबले. आणि तेथे त्यांना इंजेक्शनद्वारे भुलीच्या औषध देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. म्हसरुळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित महिलेचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते आणि याबाबतची कुणकुण तिच्या डॉक्टर पतीला लागली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

यातूनच या महिलेने आपल्या जोडीदाराच्या मदतीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन दिले, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी दोघा संशयितांपैकी कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नव्हते. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक निरिक्षक अहिरे हे करीत आहेत. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

वाशिममध्ये 60 वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार -

आता वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 60 वर्षाच्या वृद्धाने एका 15 वर्षांच्या गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम लावना येथे या 60 वर्षाच्या वृद्धाने 25 वर्षाच्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला. ही संतापजनक घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनंतर आज 25 सप्टेंबरला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. रमजान परसुवाले, असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - वाशिम : लग्नाचे आमिष देत गावातील तरुणाने दोन महिने ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेसोबत धक्कादायक प्रकार

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी भादंवि कलम 376 तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे आणि पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एसडीपीओ पांडे हे करीत आहेत.

First published:

Tags: Boyfriend, Crime news, Nashik, Women extramarital affair