मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /... अन् विना चालकच दुचाकी झाली सुरु, CCTV VIDEO मुळे भीतीचं वातावरण

... अन् विना चालकच दुचाकी झाली सुरु, CCTV VIDEO मुळे भीतीचं वातावरण

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आपल्या परिसरात आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात ज्या ऐकून, पाहून तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बब्बू शेख, येवला, 3 फेब्रुवारी : आपल्या परिसरात आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात ज्या ऐकून, पाहून तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नाही. एवढंच नाही तर अशा घटनांचे फोटो व्हिडीओही समोर येतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ काही वेळातच व्हायरल होत असलेले पहायला मिळतात. सध्या असाच काहीसा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, दारा समोर उभी असलेली मोटारसायकल विना चालक सुरु होऊन काही अंतरा प्रयन्त गेल्याची घटना घडली. ही घटना येवला शहरात समोर आली असून अचानक गाडी सुरु झाल्याचे पाहून सर्वाना आश्चर्यचा धक्का बसला. हा सर्व प्रकार सिसिटीव्हीत कैद झाला असून भुताने गाडी चालवली असल्याची अफवा पसरत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजणांना वाटत आहे की, भुताने गाडी चालवली. व्हायरल सीसीटीव्ही फूटेजमध्येही गाडीवर किंवा आसपासही कोणी दिसत नाहीये. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, असे अनेक प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. अशा व्हिडीओंमुळे भीतीचं वातावरण पसरलं जातं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ फिरत असतात. सध्या येवल्यामधील हा व्हिडीओ चर्चेत आला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

First published:

Tags: Maharashtra News, Nashik, Social media viral, Viral