मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिंदेंच्या खेळीवर अजितदादा आता स्पष्टच बोलले, अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख

शिंदेंच्या खेळीवर अजितदादा आता स्पष्टच बोलले, अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख

म्हणे, निर्णय वेगवान गतिमान सरकार पण हे तर दळभद्री सरकार आहे. 24 तास वीज देऊ, यांच्या काकाने दिली का वीज? हे गतिमान सरकार आहे?

म्हणे, निर्णय वेगवान गतिमान सरकार पण हे तर दळभद्री सरकार आहे. 24 तास वीज देऊ, यांच्या काकाने दिली का वीज? हे गतिमान सरकार आहे?

म्हणे, निर्णय वेगवान गतिमान सरकार पण हे तर दळभद्री सरकार आहे. 24 तास वीज देऊ, यांच्या काकाने दिली का वीज? हे गतिमान सरकार आहे?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

    नाशिक, 30 मार्च : 'अगोदर भाजप वाले सांगत होते या सत्तांतरात आमचा संबंध नाही. त्यांच्या धर्म पत्नी सांगत होत्या ते वेश बदलून जात होते. आता तानाजी सावंत सांगता 150 बैठका झाल्या सरकार पाडायला. असं पाडापाडीचं राजकारण केलं. आम्ही विरोधात बसलो होतो आम्ही असं केलं नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

    नाशिकमध्ये शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड उपस्थितीत होते. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षावर अजित पवार यांनी भाष्य केलं.

    'काही लोकांना राग येतो 50 खोके एकदम ओके म्हटल्यावर. आमचे लोक बैलावर लिहू लागले 50 खोके एकदम ok. रंग खेळताना लहान मुल रंग खेळताना 50 खोके एकदम ओके म्हणतात. उद्धव साहेबांचं चिन्ह काढलं, हे सगळ्या राज्याने पाहिलं आहे, आता यांना जनताच धडा शिकवले, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

    'अगोदर भाजपवाले सांगत होते या सत्तांतरात आमचा संबंध नाही. त्यांच्या धर्म पत्नी सांगत होत्या ते वेश बदलून जात होते. आता तानाजी सांवत सांगता 150 बैठका झाल्या सरकार पाडायला. असं पाडापाडीचं राजकारण केलं. आम्ही विरोधात बसलो होतो आम्ही असं केलं नाही. आम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही, असंही अजित पवार म्हणाले.

    (नितीन गडकरी भडकले; 'त्या' बातमीवरून दिली संतप्त प्रतिक्रिया)

    म्हणे, निर्णय वेगवान गतिमान सरकार पण हे तर दळभद्री सरकार आहे. 24 तास वीज देऊ, यांच्या काकाने दिली का वीज? हे गतिमान सरकार आहे? कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहे. संभाजीनगरला दंगल झाली. पोलीस काय करत आहे. जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कुठे चाललं आहे राजकारण? असा सवालही अजितदादांनी केला.

    (भावी मुख्यमंत्री अजितदादा.. बॅनर पाहून जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुका लागुद्या मग..)

    गेल्या राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बोलले होते, बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही काय भूमिका घ्यायची? उत्तर आहे का ? पुरोगामी राज्यात जे प्रकार सुरू आहे ते वेळीच ओळखले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

    पिंपरी पोटनिवडणुकीत काटे आणि कलाटे यांच्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली मात्र यश आली नाही. दोघांची मत एकत्र केले तर लोकांना सरकार पाडलेलं लोकांना आवडलेलं नाही हे दिसत. आता आम्ही जूनपर्यंत 6 ते 7 ठिकणी सभा घेणार आहोत. आपण देखील सगळे वाद विसरून एकत्र या. भांड्याला भांडं लागत ते विसरून एकत्र या, असं आव्हानही पवारांनी केलं.

    First published:
    top videos

      Tags: Ajit pawar