मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

निवडणुकीच्या मैदानात जिंकली पण सासरच्यांपुढे हरली; नाशकात महिला सरपंचाचं टोकाचं पाऊल

निवडणुकीच्या मैदानात जिंकली पण सासरच्यांपुढे हरली; नाशकात महिला सरपंचाचं टोकाचं पाऊल

Suicide in Nashik:निफाड तालुक्यातील मरळगोई (खु) येथील महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suicide in Nashik:निफाड तालुक्यातील मरळगोई (खु) येथील महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suicide in Nashik:निफाड तालुक्यातील मरळगोई (खु) येथील महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 24 नोव्हेंबर: निफाड तालुक्यातील मरळगोई (खु) येथील महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन (Drink poison) करून आत्महत्या (Woman sarpanch commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, महिला सरपंचाच्या पतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केलं असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिला सरपंचास मृत घोषित केलं आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

योगीता अनिल फापाळे असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून त्या मरळगोई (खु.) गावच्या सरपंच होत्या. याप्रकरणी मृत योगिता यांचा भाऊ संतोष शांताराम गवळी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासरे बाबासाहेब फापाळे, सासू सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे यांच्याविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती अनिल फापाळे याच्यासह सासरच्या तिघांना अटक केली आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय; महिलेनं भररस्त्यात केलेल्या कृत्यानं नगर हादरलं

मृत योगीता यांचे भाऊ संतोष गवळी यांनी फिर्यादीत सांगितलं की, 'माझी बहीण योगीता गावच्या सरपंच झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. किरकोळ कारणातून आणि चारित्र्याच्या संशयातून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून योगिता यांनी मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास विष प्राशन केलं. यानंतर पती अनिल फोपाळे यांनी तातडीनं योगीता यांना उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं.

हेही वाचा-हेअर स्टाइल करण्यास मनाई केल्यानं अल्पवयीन मुलीचं धक्कादायक पाऊल, वसईतील घटना

पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी गेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून योगीता यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला सरपंचाच्या भावानं दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासु-सासरे आणि दीर यांच्याविरोधात कौटुंबीक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik, Suicide