मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चिमुरड्याच्या आग्रह अन् राज ठाकरे झाले 'मावळा', शिर्डीतला VIDEO

चिमुरड्याच्या आग्रह अन् राज ठाकरे झाले 'मावळा', शिर्डीतला VIDEO

मनसेच्या कार्यकर्त्याचा मुलगा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आला होता

मनसेच्या कार्यकर्त्याचा मुलगा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आला होता

मनसेच्या कार्यकर्त्याचा मुलगा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आला होता

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shirdi, India

शिर्डी, 01 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिर्डीमध्ये साईंबाबांच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी विमानतळावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं. यावेळी एक चिमुरडा वडिलांच्या खांद्यावर बसून राज ठाकरे यांना शिवरायांच्या मावळ्याची टोपी भेट दिली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिर्डीत येऊन सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली. तत्पूर्वी राज ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जय श्रीरामच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला.

यावेळी एका मनसेच्या कार्यकर्त्याचा मुलगा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आला होता. गर्दी जास्त असल्यामुळे हा चिमुरडा वडिलांच्या खांद्यावर बसून राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याची टोपी घेऊन आला. राज ठाकरे यांनीही चिमुरड्याकडे पाहून टोपी स्वीकारली. नुसती स्वीकारली नाहीतर डोक्यात घालून दाखवली आणि आता बस्स का, असं म्हणून चिमुरड्याची सहमती घेतली.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भाजप खासदार सुजय विखे शिर्डी विमानतळावर पोहोचले आहे. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सुजय विखे पाटील विमानतळावर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या.

'मी राज ठाकरे यांचा व्यक्तिगत मोठा फॅन आहे. आजपर्यंत त्यांना भेटलो नाही. त्यामुळे आज भेट घेण्यासाठी आलोय.

मनसेच्या स्थानिक नगरसेवकाच्या आग्रहामुळे स्वागताला आलो आहे. मनसे भाजप युती बाबत माझ्या मनातलं माझ्या मनातच ठेवणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.

(Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार, व्यापाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

तर साई मंदिरात पोहोचल्यानंतर राज ठाकरेंना बघण्यासाठी स्थानीक ग्रामस्थांसह साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात प्रवेश करताच साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायात यांनी राज ठाकरेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर साई समाधी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे बाळा नांदगावकर हे उपस्थित होते. साई दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला आहे. दर्शनानंतर बाहेर निघताना साई मंदिराच्या गेट नंबर दोनच्या बाहेर मनसे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ, साई भक्तांची मोठी गर्दी केली होती. यावेळी तरुणाईची राज ठाकरेंसोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी झुंबर उडाली होती. यावेळी राज ठाकरेंनी गाडीमधून हात बाहेर काढत कार्यकर्त्यांना अभिवादन केले.

First published: