मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : आर्मीत भरती व्हायचंय? 'या' ठिकाणी घ्या मोफत प्रशिक्षण

Nashik : आर्मीत भरती व्हायचंय? 'या' ठिकाणी घ्या मोफत प्रशिक्षण

नाशिक जिल्ह्यातील तरुण- तरुणींसाठी मोफत निःशुल्क आर्मी भरती प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील तरुण- तरुणींसाठी मोफत निःशुल्क आर्मी भरती प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील तरुण- तरुणींसाठी मोफत निःशुल्क आर्मी भरती प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक 15 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील तरुण- तरुणींसाठी मोफत निःशुल्क आर्मी भरती प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर येथे करण्यात आले आहे. 16 सप्टेंबर 2022 ते 22 सप्टेंबर 2022 अशा 7 दिवसांचा प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभाग नोंदवावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. आर्मीत भरती होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी उत्साही असतात. ते मेहनत ही करतात. मात्र, त्यांना चांगल मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ते भरती होत नाहीत आणि हाच विचार लक्षात घेता. आमदार कोकाटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे आज ही नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुण आर्मीत देशसेवेचे काम करत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील संख्या अजून वाढावी. जास्तीत जास्त तरुण भरती व्हावे हीच आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे यांनी दिली आहे. हेही वाचा : गोल्डन चान्स! कोणतीही परीक्षा नाही थेट 1,50,000 रुपये महिना पगार; 'या' महापालिकेत मोठी भरती मोफत निःशुल्क प्रशिक्षण शिबिर आर्मी भरती प्रक्रिया प्रशिक्षण शिबिर हे पूर्णतः मोफत आहे. येणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनीच याचा लाभ घ्यावा. या प्रशिक्षण शिबिरात सर्व माहिती अगदी मुद्देसूद देण्यात येणार आहे. नेमकी ही भरती प्रक्रिया कशी असते, आपण सराव कसा केला पाहिजे, मैदानी सराव,शारीरिक चाचणी,लेखी परीक्षा या विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. प्रशिक्षण शिबिराचा पत्ता  नाशिक जिल्ह्यातील तालुका सिन्नरमधील सिन्नर महाविद्यालयात हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. तुम्ही 16 तारखेला सकाळी 7 वाजता हजर राहून सहभाग नोंदवू शकता. 7 दिवस सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत प्रशिक्षण सुरू राहील.

गुगल मॅप वरून साभार

या प्रशिक्षकांचे मिळणार मार्गदर्शन चंद्रभान पवार (सेवानिवृत्त सुभेदार,मेजर), त्र्यंबक साबळे (सेवानिवृत्त सुभेदार), ज्ञानेश्वर रूमणे (सेवानिवृत्त सुभेदार), अजित सैनदर (सेवानिवृत्त हवालदार),राजेंद्र दळवी (सेवानिवृत्त हवालदार),नवनाथ पगार (सेवानिवृत्त नाईक), नामदेव सोनवणे (सेवानिवृत्त नाईक) यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
First published:

Tags: Career, Career opportunities, Nashik

पुढील बातम्या