मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं राहत असलेल्या आश्रम शाळेत धक्कादायक घटना, आलोकसोबत भयंकर घडलं!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं राहत असलेल्या आश्रम शाळेत धक्कादायक घटना, आलोकसोबत भयंकर घडलं!


पहाटे 6 वाजेच्या सुमारास आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका ट्रॅक्टरजवळ आलोकचा मृतदेह आढळून आला होता.

पहाटे 6 वाजेच्या सुमारास आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका ट्रॅक्टरजवळ आलोकचा मृतदेह आढळून आला होता.

पहाटे 6 वाजेच्या सुमारास आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका ट्रॅक्टरजवळ आलोकचा मृतदेह आढळून आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 23 नोव्हेंबर : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधार तीर्थ आश्रमात एका चार वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं या आश्रम शाळेत राहताता, त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या का आणि कोणी केली याचा त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक विशाल शिंगारे असं या चार वर्षाच्या बालकाचे नाव आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुले तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात सोमवारी चार वर्षाच्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला ही हत्या आहे की आत्महत्या आहे अशी चर्चा सुरू असताना ही हत्या असल्याचं समोर आल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(श्रद्धाची हत्या का केली?, आफताफने कोर्टात सांगितली 'ती' परिस्थिती...)

पहाटे 6 वाजेच्या सुमारास आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका ट्रॅक्टरजवळ आलोकचा मृतदेह आढळून आला होता. या ठिकाणी असलेल्या एका मुलाने हा मृतदेह बघितल्यानंतर त्याने संस्थाचालकांना याची माहिती दिली आणि त्यानंतर संस्था चालकांनी आलोकला उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्यास वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, आश्रम शाळेतील मुलांच्या हत्येनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आश्रम शाळेतील स्वयंपाकीपासून सुरक्षारक्षकापर्यंत सर्वांचीच कसून चौकशी सुरू केली आहे. याच आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा देखील पोलिसांनी काढून नेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे या शाळेच्या व्यवस्थापकांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी हा DVR ही ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

(घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव)

त्र्यंबकेश्वर येथील हे आधार तीर्थ आश्रम हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभारण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी इतरही गोरगरिबांची मुलंही दाखल करण्यात आली आहे. मात्र एका चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप देखील समजू शकल नाही. मात्र आश्रम शाळेत यापूर्वी देखील मुलांचा छळ होत असल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली असून लवकरच या प्रकरणातील आरोपीचा शोध लागेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published: