लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 29 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात चोरी, दरोडा (Robbery) आणि घरफोडीच्या अनेक घटना समोर येत आहेत. नाशिक शहरात सोनसाखळी हिसकावण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक पोलिसांनी एका टोळीला अटक केली होती. ही घटना ताजी असताना, काही अज्ञात चोरट्यांनी नाशिक शहरात धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री भामट्यांनी नाशिकमधील पाच मेडिकल दुकानं फोडली (5 medical shop broke in one night) आहेत. दरोडेखोरांनी दुकाचं शटर उचकटून लाखोंचा ऐवज लुटला आहे. संबंधित सर्व घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Robbery capture in CCTV) झाली आहे.
या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींची अद्याप ओळख पटली नसून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. एकाच रात्री पाच मेडिकल स्टोअरवर दरोडा पडल्याने नाशकात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-हात बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावून कापला गळा; नागपुरात महिला डॉक्टरची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी नाशिक शहरात धुमाकूळ घातला आहे. आरोपींनी एकाच रात्री नाशिक रोड परिसरातील एकूण 5 मेडिकल दुकानावर दरोडा टाकला आहे. मध्यरात्री आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी संबंधित पाच मेडिकलमधून हजारो रुपयांच्या रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
काही अज्ञात चोरट्यांनी नाशिक शहरात धुमाकूळ घातला आहे. भामट्यांनी एकाच रात्री नाशिकमधील पाच मेडिकल दुकानं फोडली आहेत. pic.twitter.com/Q73oIpHZ31
— The मराठी Medium (@MarathiMedium) November 29, 2021
संबंधित चोरीची घटना मेडिकलबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता, तीन चोरटे दुकानाचं शटर उचकटताना दिसत आहेत. तर अन्य एक आरोपी पहारा देताना दिसत आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. एकाच रात्रीत पाच दुकानावर दरोडा पडल्याने नाशिक रोड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik, Robbery