मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; बाभळीच्या झाडाजवळ आढळला मृतदेह, घटनेने नाशिक हादरलं

22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; बाभळीच्या झाडाजवळ आढळला मृतदेह, घटनेने नाशिक हादरलं

22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेने नाशिकमध्ये खळबळ

22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेने नाशिकमध्ये खळबळ

Youth killed by crushing head with stones in Nashik: नाशिक-कळवण राज्य महामार्गाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 21 डिसेंबर : नाशिकमध्ये हत्या सत्र काही थांबताना दिसत नाहीये. आता पुन्हा एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील दिपक जनार्दन जाधव या 22 वर्षीय युवकाची रात्रीच्या (20 डिसेंबर) सुमारास अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक-कळवण राज्य महार्गालगत सार्वजनिक वाचनालयाजवळील बाभळीच्या झाडाजवळ झुडपांमध्ये प्रेत टाकून पळ काढला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि पोलिस कर्मचारी घटनेचा पुढील तपास करत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन दिपकचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. दिपकची दगडाने ठेचून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हे कृत्य कुणी केलं आणि हत्येमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले अन् मंगळसूत्र घेऊन पळाले, नाशकातील घटनेचा CCTV

मिठी मारल्याने वादाला फुटलं तोंड, तरुणावर जीवघेणा हल्ला

नाशिक शहरातील आडगाव परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. मिठी मारल्याच्या कारणातून काही तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आठवड्याभरापूर्वी समोर आली होती. या हाणामारीत एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दीपक वाघमारे असं जीवघेणा हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी जखमी दीपकच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यामुळे दीपक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आडगाव परिसरात आला होता. यावेळी आरोपी तरुणाने वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली. त्यामुळे दीपक याने मित्राला मिठी का मारली असा जाब विचारला. यावेळी संतापलेल्या आरोपीनं दीपकवर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहे.

वाचा : लैंगिक समस्येवर उपचारासाठी गेला अन् भलतीच समस्या घेऊन आला

भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार

नाशिक शहरातील सिडको परिसरात भर दिवसा एका टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली 10 दिवसांपूर्वी घडली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील रायगड चौक येथील शिवनेरी उद्यानाजवळ ही घटना घडली होती. मोहन देवकर असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाने नाव आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची परिस्थितीत गंभीर आहे.

First published:

Tags: Crime, Murder, Nashik