Home /News /maharashtra /

सीईटी क्लासवरुन परत येताना तरुणीवर काळाचा घाला, भीषण अपघातात मृत्यू

सीईटी क्लासवरुन परत येताना तरुणीवर काळाचा घाला, भीषण अपघातात मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सीईटीचा क्लास संपवून घरी जाणाऱ्या तरुणीच्या दुचाकीला अपघात (Bike Accident) झाला. यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू (Death in Accident) झाला आहे. तर अपघातात आणखी दोन जणी जखमी झाल्या आहेत.

    नाशिक, 29 मे : पतीचा अपघात झाल्यानंतर, पत्नी जखमी पतीला पाहायला जात असताना पत्नीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (Wife Death in Accident) झाला होता. ही घटना ताजी असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीसोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. काय आहे घटना - सीईटीचा क्लास संपवून घरी जाणाऱ्या तरुणीच्या दुचाकीला अपघात (Bike Accident) झाला. यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू (Death in Accident) झाला आहे. तर अपघातात आणखी दोन जणी जखमी झाल्या आहेत. साक्षी अनिल खैरनार असे अपघातात मृत्यू झालेल्या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. नांदूर शिंगोटे तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथील तीन तरुण विद्यार्थींनी सीईटी क्लासला (CET Class) गेल्या होत्या. त्यांचा क्लास संपल्यानंतर त्या घरी येत होत्या. या दरम्यान, त्यांची दुचाकी एका उभ्या ट्रकला धडकली आणि या अपघातामध्ये एकीचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी तत्काळ बचावकार्यही केलं. याप्रकरणी नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्र आणि महामार्ग पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातातील तरुणीच्या मृत्यूमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणीची दुचाकी होती भरधाव - साक्षी अनिल खैरनार हिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. यानंतर तिने सीईटीचा क्लास लावला होता. यासाठी ती तिच्या दोन मैत्रिणी संगमनेर येथे सीईटी क्लासला (CET Class) गेल्या होत्या. क्लास संपल्यानंतर त्या परत घरी येत होत्या. मात्र, त्यांची दुचाकी (क्रमांक MH 15 HL 1419) ही भरधाव वेगात होती. ही भरधाव दुचाकी खंडोबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (क्रमांक HR 61 D 9843) धडकली आणि भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात साक्षी खैरनार या तरुणीचा मृत्यू झाला. हेही वाचा - नागपूर : घोडा नाचवता नाचवता भयंकर घडलं; मामाच्या वरातीत भाच्याचा दुर्देवी अंत तर तिच्या दोन मैत्रिणी या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सविता सूर्यभान सांगळे आणि वर्षा जगताप, असे जखमी तरुणीचे नाव आहे. या दोन्ही तरुणींवर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Major accident, Nashik

    पुढील बातम्या