मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /क्लास वन सतीश खरेचा थर्ड क्लास कारनामे, घरात आढळली 16 लाखांची कॅश, 54 तोळे सोनं आणि...

क्लास वन सतीश खरेचा थर्ड क्लास कारनामे, घरात आढळली 16 लाखांची कॅश, 54 तोळे सोनं आणि...

13 बँकांमध्ये सतीश खरे यांचं अकाउंट असून यामध्ये जवळपास 45 लाख रुपये असल्याचं समजते तसेच अनेक ठिकाणी जमिनी देखील खरेदी केल्या आहे.

13 बँकांमध्ये सतीश खरे यांचं अकाउंट असून यामध्ये जवळपास 45 लाख रुपये असल्याचं समजते तसेच अनेक ठिकाणी जमिनी देखील खरेदी केल्या आहे.

13 बँकांमध्ये सतीश खरे यांचं अकाउंट असून यामध्ये जवळपास 45 लाख रुपये असल्याचं समजते तसेच अनेक ठिकाणी जमिनी देखील खरेदी केल्या आहे.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 20 मे : नाशिकच्या एसीबीने तब्बल 30 लाखांची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी अटक केली. या अटकेनंतर जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाल. लाचखोर सतीश खरे यांचं सहकार विभागाने निलंबन देखील केलंय. लाचखोर सतीश खरेचे खोटे कारनामे यानिमित्ताने चर्चेचा विषय बनला आहे.

लाचखोर सतीश खरे हा क्लास वन ऑफिसर आणि नाशिक जिल्ह्याचा उपनिबंधक होता. सहकार विभागात खरेचा मोठा दबदबा होता. त्याच्या विरोधात अनेक तक्रारी असतांना त्याच्यावर कारवाई होत नव्हती ही विशेष बाब आहे. सोमवारी याच लाचखोर सतीश खरे कडे नाशिक जिल्ह्यातील चार बाजार समितीच्या संदर्भात दाखल तक्रारीवर सुनावण्या होत्या. त्यामध्ये अनेक उमेदवार तथा विद्यमान संचालकांवर आक्षेप घेण्यात आल्यानं ही सुनावणी होती. त्यामध्ये नाशिक, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत आणि घोटी या बाजार समितीच्या संदर्भात सुनावणी होती. त्याच दरम्यान एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देतो म्हणून तीस लाखांची मागणी केली होती. त्यात 30 लाख स्वीकारत असतांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्या

मध्ये शैलेश सुमतीलाल सुभद्रा या वकीलासह सतीश खरेला अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान एसीबीने केलेल्या घर झडतीत लाखो रुपयांची रोकड, सोनं आणि चांदी असं घबाड हाती लागलंय.

एसीबीने लाच घेतांना सतीश खरेला अटक केल्यानंतर दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामध्ये लाचखोर खरेचे खोटे कारनामे चर्चेचा मुद्दा बनला आहे.

खरेचे कारनामे

- त्र्यंबकेश्वर येथील कैलास नागरी पतसंस्थेत अपहार सिद्ध होऊनही अद्याप गुन्हा दाखल नाही, यामध्ये प्रकरण दाबल्याचे बोललं जात आहे.

- राजलक्ष्मी बँकेचे निवडणूक अधिकारी असतांना नियम डावलून उमेदवारी अर्ज मागे घेतले होते, त्यात चौकशी झाल्यावर खरे दोषी आढळून आलेला असतांना कुठलीही कारवाई त्याच्यावर झाली नाही

- ओझर येथील सिद्धिविनायक बँकेच्या संचालकांनी केलेल्या अपहारानंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यात कारवाई करण्याऐवजी खरे याने दारूच्या पार्ट्या केल्याची ओझरसह जिल्ह्यात चर्चा आहे.

- जिल्हा बँकेतून गटसचिव यांना अनुदान काढून दिले पण परत घेतांना बेअरर चेक घेऊन पैसे परत घेतल्याचा खरेवर आरोप आहे.

- नामको बँकेच्या संचालकांनीही तीन वेळा खरेच्या विरोधात उपोषण केले आहे. त्यामध्ये निवडणूक सदोष पद्धतीने राबविल्याचा आरोप खरेवर आहे.

- बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करुन मिळावा यासाठी 93 लाखांची लाच घेतल्याचा आरोप केला असून कर्मचाऱ्यांनी नार्को टेस्टची मागणी केली आहे.

- काही दिवसांपूर्वी नाशकात झालेल्या खाजगी सावकारी प्रकरणात देखील लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे

- खरे याला देवळाली मतदार संघातून निवडणूक लढवायची होती. त्यासाठी तो ही माया जमवत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

तर दुसरीकडे लाचखोर सतीश खरे याला ज्या कारणासाठी लाच दिली त्या बाजार समितीच्या राजकारणामागील अर्थकारणही यानिमित्ताने चर्चेचा विषय बनला असून संपूर्ण सहकार क्षेत्रात घबराट निर्माण झाली आहे. बाजार समितीचा निकाल आपल्या बाजूने लावून घेण्यासाठी तब्बल 30 लाख मोजले जात असतील तर दुसरीकडे निवडणुकीत पैशांची किती उधळण होत असेल याचा अंदाज न लावलेला बरा. परंतु ज्या बाजार समितीवर संचालक होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. त्या बाजार समितीत मलिदा किती मिळतो? याबद्दल सर्वसामान्य जनतेला सहज पडणारा हा मोठा प्रश्न आहे.

लाचखोर अधिकारी सतीश खरे याच्या मालमत्तेची चौकशी देखील एसीबीकडून सुरू आहे 13 बँकांमध्ये सतीश खरे यांचं अकाउंट असून यामध्ये जवळपास 45 लाख रुपये असल्याचं समजते तसेच अनेक ठिकाणी जमिनी देखील खरेदी केल्या आहे. सतीश खरे यांच्याबाबत तक्रारी असेल तर पुढे यावे असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केलं आहे

First published:
top videos

    Tags: Nashik