मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात हैदोस, नाशिक जेलमध्ये आणल्यानंतर गुन्हेगारांचा थयथयाट, पोलिसावर जीवघेणा हल्ला, भयानक राडा

पुण्यात हैदोस, नाशिक जेलमध्ये आणल्यानंतर गुन्हेगारांचा थयथयाट, पोलिसावर जीवघेणा हल्ला, भयानक राडा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह

नाशिकरोड कारागृहातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 18 ऑगस्ट : पोलीस सर्वसामान्या जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतात. आपल्यावर कोणतंही संकट आलं की पोलीस सर्वात आधी आपल्या जनतेसाठी धावून जातात. पोलिसांमुळे शहर, गाव-खेड्यांमध्ये, राज्यात आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहते. पोलिसांमुळेच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो. सर्वसामान्य जनता रात्रीच्या वेळी आपल्या घरात सुखाने झोपू शकते. पण सर्वांची काळजी घेणारे हे पोलीसच सुरक्षित नाही की काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नाशिकरोड कारागृहात तशीच एक घटना घडली आहे. पुण्यात राडा करुन आलेल्या 10 ते 12 कैद्यांनी एका जेलमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. नाशिक कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात राडा करून आलेल्या 10 ते 12 कैद्यांनी एका जेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण करत सेंट्रल जेलमध्ये राडा घातला. यामध्ये जेल पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय. याची दखल राज्याच्या जेल उपमहानिरीक्षक यांनी घेतलीय. पण या घटनेनं जेलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नाशिकरोड कारागृहातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. विशेष म्हणजे काल जीवघेना हल्ला झाला तरी अद्याप या संदर्भात पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीय. एकूणच या हल्ल्यात प्रभूचरण पाटील हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (रायगडमध्ये आणखी एक बोट आढळली, काही जण पळून गेल्याचा संशय) प्रभूचरण पाटील यांच्याकडे भांडार सहा आणि सात अशा दोन ठिकाणची जबाबदारी देण्यात आलेली होती. या दोन्ही ठिकाणी जवळपास 500 पेक्षा जास्त कैदी आहेत. काल कर्त्यव्यावर असतांना जवळजवळ दहा ते बारा कैद्यांनी पाटील यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. एक महिन्यापूर्वी पुण्याच्या येरवडा जेलवरून हल्ला करणारे कैदी नाशिकला स्थलांतरीत करण्यात आले होते. या घटनेनंतर कारागृह उपमहानिरीक्षक यांनी नाशिकच्या कारागृहात येऊन घटनेची माहिती घेतली आहे. तसेच संपूर्ण राज्यात कैद्यांची वाढलेल्या संख्येपुढे जेल पोलिसांच बळ तोकडं पडतंय. त्यामुळे असे हल्ले होत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाकडून काढला जातोय. नाशिकच्या कारागृहात झालेला राडा खळबळ उडवून देणारा असला तरी दुसरीकडे यानिमित्ताने कारागृहाची सुरक्षा पून्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Crime, Nashik

पुढील बातम्या