Home /News /maharashtra /

शिवसेनेचा दणका, भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद हिसकावली

शिवसेनेचा दणका, भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद हिसकावली

महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

    नाशिक, 2 जानेवारी : नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेनं दिलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यामुळे अध्यक्षपदासाठीचं संख्याबळ जुळून आलं. त्यामुळे अखेर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. 602 केबिनबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार भडकले एकीकडे नाशिकमध्ये भाजपला धक्का बसला असतानाच पश्चिम महाराष्ट्रातही आज राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 'कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आज संपुष्टात येणार आहे. काही वेळापूर्वीच कोल्हापूर जिल्हा परिषदेची सभा सुरू झाली असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीला यश मिळणार आहे,' असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी, छगन भुजबळांविरोधात काम केल्याचा ठपका कोल्हापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपले सदस्य सहलीवर नेले होते. तर भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते. दोन्हीकडचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले असून थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. काँग्रेसचे बजरंग पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी हा आणखी एक धक्का ठरण्याची शक्यता आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Bjp-shivsena, Nashik

    पुढील बातम्या