कोरोना विरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्ये नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल

कोरोना विरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्ये नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागरण, कुटुंब निरीक्षण यासोबतच ग्रामीण भागातील कुपोषण रोखण्यासाठी जिल्हा परिषद जोमानं कामाला लागली आहे.

  • Share this:

नाशिक 02 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही योजना तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खास लक्ष घातलं आहे. या योजनेत नाशिक जिल्हापरिषदेने आघाडी घेतली आहे. या उपक्रमात आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन तपासणी करणार आहेत.

माझे कुटुंब माझी जबाबदारी हा सरकारी उपक्रम नाशिक जिल्ह्यात मोठ्या धडाक्यानं राबविला जातोय. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागरण, कुटुंब निरीक्षण यासोबतच ग्रामीण भागातील कुपोषण रोखण्यासाठी जिल्हा परिषद जोमानं कामाला लागली आहे. ग्रामीण भागात याला मोठा प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे राज्यात या योजनेत नाशिक जिल्हा परिषदेनं अव्वल क्रमांक पटकावलाय.

नाशिक जिल्हा परिषदेने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमासोबतच कुपोषण निर्मुलनाचाही कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारनं  एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची निर्मिती केली आणि राज्य सरकारच्या साथीनं विशेष योजना सुरू केली ती कुपोषण रोखण्यासाठी. आपली कौटुंबिक सुरक्षितता जपण्यासाठी ग्रामीण भागातील कुपोषण नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने ‘एक मूठ पोषणा’ची ही योजना घरोघरी पोहचवली जातेय.

बेशिस्त मुंबईकरांना BMCचा दणका, ‘मास्क’ न घालणाऱ्यांना 60 लाखांचा दंड

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ही योजना तयार केली असून त्याची अंमलबजावणीसाठी विभाग दौराही केला आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत, नाशिक जिल्ह्यात तीव्र कुपोषित 800, मध्यम कुपोषित 2000 बालकांची नोंद झाली आहे. या बालकांपर्यंत थेट पोचण्याचा धडक कृती कार्यक्रम जिल्हा परिषदेचा महिला आणी बालविकास विभाग करत आहे.

आईनेच मुलगी समजून अर्भक फेकून दिलं, मात्र निघाला मुलगा; धक्कादायक घटना उघड

त्र्ययंबकेश्वरच्या 100 तीव्र कुपोषित बालकांना कॅलरी, प्रोटीन, हिमोग्लोबिन, वजन वाढण्यासाठी तेल यांचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे हाय रिस्क मदर मॉनिटरिंग सुद्धा केलं जातं आहे. नाचणी सत्व, व्हिटॅमिन्स यांचा नियमित आणि संतुलीत आहाराचं नियोजन करून माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत कुपोषण निर्मूलन कार्यही केलं जात आहे. त्या उपक्रमाचा कोरोनाकाळात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही मोठ उपयोग होणार असल्याचंही लीना बनसोड यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या