एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर चाकूनं 18 वेळा केले सपासप वार, तरुणीची मृत्यूशी झुंज

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर चाकूनं 18 वेळा केले सपासप वार, तरुणीची मृत्यूशी झुंज

एका माथेफिरू तरुणाने कॉलेज तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

  • Share this:

मनमाड, 7 सप्टेंबर : एका माथेफिरू तरुणाने कॉलेज तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपीनं तरुणीवर तब्बल 18 वेळा धारदार चाकूनं सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. लासलगावातील दत्तनगर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. लासलगावातील  रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणीला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. सतीश ढगे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

(वाचा : पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं... असं व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या)

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर हल्ला केल्यानंतर सतीशने स्वतःवर देखील चाकूनं वार केले आहेत. यात तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दोघंही एकाच कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिकत होते.  एकतर्फी प्रेमातून सतीशने तरुणीवर हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी शनिवारी लासलगाव बंदची हाक दिली आहे.

(वाचा : पुण्यात त्याने चाकूने केले चुलत बहिणीवर वार, वाचा नेमकं काय आहे कारण..)

भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 07:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading