धक्कादायक ! मुलानंच केली आईची निर्घृण हत्या, घरात मृतदेहासोबतच राहिला 3 दिवस

धक्कादायक ! मुलानंच केली आईची निर्घृण हत्या, घरात मृतदेहासोबतच राहिला 3 दिवस

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

येवला, 23 जून : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मुलानंच स्वतःच्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आले. येवला येतथील बुंदेलपुरा परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. लीलाबाई गुजर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी मुलगा राजेंद्र गुजर याला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी राजेंद्र गुजर यानं आईची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तीन दिवस घरातच लपून ठेवला होता. गुजर कुटुंबीयांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, राजेंद्रनं आईची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, याची माहिती स्पष्ट झालेली नाही. पण राजेंद्र हा व्यसनाच्या आहारी गेला होता. दारूसाठी तो वारंवार आईकडे पैशांची मागणी करत असे. या कारणामुळे अनेकदा त्यांच्यात वाद होत असत, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

वाचा अन्य बातम्या

'आता तुम्ही तरी वाचवा', NCP कार्यकर्त्याचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ 

VIDEO: 'इंद्रायणी' झाली दूषित, ग्रामस्थ म्हणाले पाणी पिऊ नका!

बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या व्यापाऱ्यानं टोईंग गाडीसमोर केला 'हा' प्रकार

SPECIAL REPORT: युतीची दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री कोणाचा होणार?

First published: June 23, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading