नाशिकमधील महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, नवी माहिती समोर

नाशिकमधील महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, नवी माहिती समोर

सुनेनंच सासूचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 12 फेब्रुवारी : नाशिकमधील महिला खून प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. सुनेनेच केला सासूचा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सून छाया सचिन पाटील हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सासू घरात भांडण लावून देते, असा समज करून घेऊन सुनेनं तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी केली गुन्ह्यांची उकल केली आहे. बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली होती. बेपत्ता मंदाकिनी पाटील यांची हत्या झाल्यानं या प्रकरणातील गूढ वाढलं होतं.

काय आहे प्रकरण?

नाशिकच्या उपनगरच्या जेलरोड येथील 60 वर्षीय महिला मंदाकिनी पाटील या 1 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. याबाबत उपनगर पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद ही कुटुंबीयांनी केली होती. इतकंच नव्हे तर बेपत्ता असलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी महिला शोधून दिल्यास 25 हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केलं होतं.

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, 25 वर्षीय तरुणीवर नवऱ्याच्याच संमतीने बलात्कार

मात्र, मंगळवारी दुपारच्या सुमारास घराजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडाजवळून वास येत असल्यानं आजूबाजूच्या नागरीक शोध घेतला त्यावेळी गोणीत बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. उपनगर पोलिसांनी याबाबत पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला होता. त्यानंतर सुनेनंच सासूचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

First published: February 12, 2020, 8:32 PM IST

ताज्या बातम्या