नाशिक, 01 जून : शिक्षकी पेशाला काळीमा फासणार प्रकार देवभूमी नाशिकमध्ये घडलाय. एका शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवत होता. हा प्रकार समजल्यानंतर पालकांनी या शिक्षकाची चांगलीच धुलाई केली.
इंदिरानगर भागातील सेंट फ्रांसेस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला. सुनील कदम असं हा शिक्षकाचं नाव आहे. त्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज केलं होतं. एवढंच नाहीतर त्याने या विद्यार्थिनीला अश्लिल मॅसेजही पाठवले होते.
ही बाब पीडितेने आपल्या आई-वडिलांना सांगितली असता सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर या पालकांसोबत इतर पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. संतप्त पालकांनी या शिक्षकावर खुर्च्याही फेकून मारल्या.
दरम्यान, पीडित विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीवरून या शिक्षकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाॅक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.