मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik Rain Update : नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, सप्तशृंगी गडावर ढगफुटी अनेक भाविक जखमी

Nashik Rain Update : नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, सप्तशृंगी गडावर ढगफुटी अनेक भाविक जखमी

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काल(दि.12) चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे काही भाविकांना याचा मोठा फटका बसला.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काल(दि.12) चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे काही भाविकांना याचा मोठा फटका बसला.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काल(दि.12) चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे काही भाविकांना याचा मोठा फटका बसला.

  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 12 जुलै : राज्यात पावसाने थैमान घातले आहे. (Maharashtra rain update) कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Konkan rain) काही जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस (heavy rainfall) झाल्याने नद्यांना पूर (Nashik flood) आला आहे. दरम्यान नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काल(दि.12) चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे काही भाविकांना याचा मोठा फटका बसला. अचानक झालेल्या पावसामुळे सहा ते सात भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने सूचना करण्यात आल्या आहेत. (Nashik rain update)

नाशिक जिल्ह्यातील साडे तीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावातील संपर्क तुटला आहे. याचबरोबर सप्तश्रृंगी गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यामध्ये सहा ते सात भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : पुणे, कोल्हापूरसह या जिल्ह्यांना पुढील 2 दिवस रेट अलर्ट; मुंबईमध्ये कशी असेल पावसाची स्थिती?

नाशिकच्या (Nashik Rain Update) अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात पावसाचा हाहाकार (Heavy to heavy Rain) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे 7 नद्यांना पूर आले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.

नाशिकमध्ये अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा : नाशिकमध्ये रेड अलर्ट; ग्रामीण भागात पहिली ते बारावीपर्यंत सुट्टी जाहीर

नार-पार, अंबिका, वाझडी, तान-मान, कावेरी पिंजाळ, दमणगंगा या नद्या तर धोक्याच्या पातळी जवळ पोहचल्या असून पाऊस असाच सुरू राहीला तर या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडतील. दुसरीकडे पुराच्या पाण्याखाली रस्ते आणि छोटे पूल गेले असल्यामुळें पिंपळसोंड, खुंटविहीर, शिराळा, अळीवपाडा, उंबरवाडा, दोडीपाडा, म्हैसखडक, बोरचोंड, कुकुडमंडा, वाघाडी, आमदा, वांगण, वाजवड, उंबुरणे, मंनखेड आदी गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

First published:

Tags: Monsoon, Nashik, Rain fall, Rain flood, Weather forecast, Weather update, Weather warnings

पुढील बातम्या