Home /News /maharashtra /

Nashik Police Inspector : तब्बल 24 वर्षांनी आव्हाडांना क्लिन चिट, 350 रुपयांची लाच घेतल्याचा होता ठपका

Nashik Police Inspector : तब्बल 24 वर्षांनी आव्हाडांना क्लिन चिट, 350 रुपयांची लाच घेतल्याचा होता ठपका

नाशिकजवळील (Nashik) येवला येथे दामू आव्हाड पोलीस निरीक्षक (Police inspector) म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.

  नाशिक, 02 जून : नाशिकजवळील (Nashik) येवला येथे दामू आव्हाड पोलीस निरीक्षक (Police inspector) म्हणून कार्यरत होते. त्यांना 1988 साली एका प्रकरणात 350 रुपयाची लाच घेतल्याबाबत (bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) (एसीबी) अटक केली होती. 1998 साली कनिष्ठ न्यायालने (court) त्यांना दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याचा निकाल लागला आहे यामध्ये आव्हाड यांना क्लिन चिट (clean chit) देण्यात आली आहे. यामुळे तब्बल 24 वर्षांनी न्याय मिळाला आहे.

  साडेतीनशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आणि एक वर्षाची शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची चोवीस वर्षांनंतर उच्च न्यायालयाने मागच्या दोन दिवसांपूर्वी त्यांना निकाल देऊन सोडले. आव्हाड यांना आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी तब्बल 24 वर्षे त्यांना वाट पहावी लागली. दरम्या ते लाच घेतल्याचा ठपका ठेवून जगत असल्याने त्यांच्यावर सामाजिक प्रश्नाना सामोरे जात जगावे लागल्याची खंत असल्याचे समजले.

  हे ही वाचा : 'काय झाडी, काय डोंगार' फेम आमदार होणार का पर्यटन मंत्री? का भाजपकडून गेम?

  दामू आव्हाड हे 1988 मध्ये नाशिक येथील येवला पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यकत होते. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना 350 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर 1998 मध्ये नाशिक येथील विशेष न्यायालयाने आव्हाड यांना 350 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवून त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याचवर्षी आव्हाड यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर तब्बल चोवीस वर्षे आव्हाड यांचा संघर्ष सुरू होता.

  हे ही वाचा : मुख्यमंत्री होणार हे तुम्हाला कधी समजलं? एकनाथ शिंदेंचं उत्तर वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

  न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या एकल खंडपीठाने आव्हाड यांच्या अपिलावर निर्णय देताना त्यांना दिलासा दिला. कथित लाचेची रक्कम वसूल करणे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाही, आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले आहे, असे न्यायालयाने आव्हाडांना दिलासा देताना म्हटले. या अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे किंवा त्याच्याकडून वसूल करण्यात आलेली रक्कम लाचेचीच आहे, हे पोलिसांना सिद्ध करता आले नसल्याचेही न्यायालयाने सांगितले.

  First published:

  Tags: Nashik, Police, Police arrest

  पुढील बातम्या