मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नव्या पोलीस आयुक्तांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ

नव्या पोलीस आयुक्तांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच जुगार, अवैध मद्यविक्री, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच जुगार, अवैध मद्यविक्री, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच जुगार, अवैध मद्यविक्री, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नाशिक, 16 ऑक्टोबर: नाशिक शहरात लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच जुगार, अवैध मद्यविक्री, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, कारवाईच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...कन्हैय्या कुमार यांनी घेतली ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची भेट, राज्यात खळबळ

जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आणि प्रादेशिक परिवहन विभागाला (RTO)पत्र पाठवत दणका पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे. शहरातील अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र विभाग असल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांचा थेट संबंध नाही. त्यामुळे असे प्रकार वाढल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत असल्याने संबंधित विभागांना कारवाई करण्याबाबत पत्र दिले असल्याचं पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलं आहे.

अवैध मद्यविक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क, तर अवैध प्रवासी वाहतुकीची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. याबाबत पोलिसांचा थेट संबंध नाही. त्यामुळे संबंधित विभागांना कारवाई करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. या विभागांनी मदत मागितली, कारवाईची मुभा दिली, तरच पोलिस हस्तक्षेप करतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच जुगारामुळे अधिकृत लॉटरी व्यवसायाचे उत्पन्न बुडते. त्यामुळे महसूल विभागात यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित आहे, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

शहरात अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत, असं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे सरकारकडून तुम्हाला सर्वाधिकार देण्यात आले आहेत. रोलेट, लॉटरी, जुगार यावर कारवाई तुम्ही करणं अपेक्षित आहे. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला कळवा, आम्ही कारवाई करू, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना पत्र...

मद्य विक्रीला परवाना तुम्ही देता त्यामुळे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई करण्याचे अधिकारही तुम्हाला आहेत. विनापरवाना मद्य विक्री, अवैध विक्री यावर कारवाई करा. तुम्हाला अशक्य असेल तर आम्हाला सांगा, असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

आरटीओला पत्र...

अवैध वाहतूक, विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि वाहनचलकांवर कारवाई करण्याचे अधिकार

तुम्हाला आहेत. सरकारनं कारवाई करण्याचे अधिकार तुम्हालाही दिले आहेत. कारवाई करा. अशक्य असेल तरच आम्हाला सांगा, असं प्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या पत्रात पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा...महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

दरम्यान, लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच शहरात गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. जुगारासह अवैध मद्यविक्री करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख गुन्ह्यांबाबत संबंधित विभाग खरोखर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Maharashtra police, Nashik