गगनाला भिडलेला कांदा पुन्हा जमिनीवर! सर्वसामान्यांना दिलासा मात्र कांदा उत्पादक हवालदिल

गगनाला भिडलेला कांदा पुन्हा जमिनीवर! सर्वसामान्यांना दिलासा मात्र कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने क्विंटल मागे 2699 रुपयांची घसरण झाली आहे.

  • Share this:

बब्बू शेख (प्रतिनिधी)मनमाड, 21 डिसेंबर: गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं मात्र शनिवारी मोठा दिलासा दिला आहे. 9 हजार 875 रुपयांवरून कांद्या थेट 6 हजार रुपयांवर घसल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सरासरी भावात प्रति क्विंटल 3354 रुपयांनी दर कोसळले आहे. अवघ्या 4 दिवसात दरात मोठी घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

मागील काही आठवड्यांपासून कांद्याचे दर जवळपास 150 ते 120 रुपये प्रतिकिलो होते. तर मागच्या आठवड्यात कांद्या 65 रुपये किलो या दराने मिळत होता. एकूणच कांद्याची वाढणारी मागणी लक्षात घेता केंद्र सरकारनं कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर घसण्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. शनिवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सर्वसामान्यांना कांद्याचे दर कमी झाल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.

वाचा-भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंबाबत शरद पवारांचे मोठे विधान

बाजार समितीमध्ये चार  दिवसा पूर्वी कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 9875 रुपये तर सरासरी 7700 रुपये इतका भाव मिळाला होता. तर  आज जास्तीत जास्त 6521 रुपये तर सरासरी 5001 रुपये इतका भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांद्याचे गगनाला भिडलेले दर लक्षात घेता त्याची मागणी कमी होत गेली आणि आता आवक जास्त तर मागणी कमी अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे भावात मोठी घसरण झाल्याचं स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

अवकाळी पाऊस, महापूर, ढगाळ हवामान यामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे कांद्याची आवक घटली होती आणि भाव वाढला होता. कांद्यानं जरी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असलं तरीही शेतकरी मात्र आनंदात होते. शनिवारी सकाळी मात्र हे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. लासगाव बाजार समितीमध्ये कांद्याला 6521 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. स्वयंपाक घरातून गायब झालेला कांदा आता पुन्हा दिसणार असल्यानं गृहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

वाचा-राज ठाकरेही देणार मोदी-शहांच्या महत्त्वाकांक्षी कायद्याला आव्हान?

Published by: Kranti Kanetkar
First published: December 21, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading