मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shivsena Vs Rane : शिवसेना-राणे वाद पेटला; शिवसैनिक सोडणार होते भाजप कार्यालयात कुत्रे!

Shivsena Vs Rane : शिवसेना-राणे वाद पेटला; शिवसैनिक सोडणार होते भाजप कार्यालयात कुत्रे!

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत 'हे भाजपचे कुत्रे' अशी...

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत 'हे भाजपचे कुत्रे' अशी...

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत 'हे भाजपचे कुत्रे' अशी...

नाशिक, 16 मार्च : मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून भाजपचे (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपूत्र आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देत नाशिकमध्ये युवासेनेच्या शिवसैनिकांनी आक्रमक होत राणे-पिता पुत्रांची तुलना थेट कुत्र्यांशी केली आहे.

राणे आणि शिवसेनेत वाद महाराष्ट्रासाठी नवीन नाही. या ना त्या मुद्यांवरून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही मुलं शिवसेनेवर टीका करत असतात. सेनेचे नेतेही आपल्या शैलीत प्रत्युत्तर देत असतात. पण, दोन दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर सचिन वाझे यांच्याशी संबंध जोडत अनेक गंभीर आरोप केले. त्यामुळे नाशिकमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज अनोखं आंदोलन केलं.

आर्ची सिंगचा परदेशात डंका; Miss Trans International जिंकणारी पहिली भारतीय

आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्याकर्त्यांनी नाशकात थेट भाजप कार्यालयावरच चाल ठोकली. ती ही चक्क 2 कुत्र्यांसहीत. वेळीच पोहोचलेल्या पोलिसांनी,या आक्रमक कार्यकर्त्यांना भाजप कार्यालय जवळील गल्लीत रोखलं. तरीही आंदोलन त्यांनी केलंच. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत 'हे भाजपचे कुत्रे' अशी नुसती भाषाच या आंदोलकांनी वापरली नाही तर चक्क 2 कुत्र्यांच्या गळ्यात, त्यांच्या नावाच्या, पाट्याही लटकविल्या.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी या दोन खेळाडूंना संधी मिळणार!

हे सुरू असलेलं आंदोलन पाहून पुढे काही दिवसांत संघर्ष अधीक तीव्र होण्याची चिन्ह आहे. पण जनावरांचा असाही उपयोग करण्याची धक्कादायक मानसिकता ठळकपणे समोर आल्यानं,राजकारणाची पातळी इतकी का घसरली आहे का? अशी  चर्चा सुरू झाली आहे. मुक्या जनावरांचा असा उपयोग, खरंतर कायद्यानं हा गुन्ह्याच आहे. मात्र, सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हा गुन्हा, पोलीस दाखल करणार का ? हा प्रश्न आज जरी अनुत्तरीत आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Nitesh rane, Sachin vaze