मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मारुती ciaz कार पेटल्यानंतर अचानक झाली लॉक, संजय शिंदेंनी प्रयत्न केला, पण...

मारुती ciaz कार पेटल्यानंतर अचानक झाली लॉक, संजय शिंदेंनी प्रयत्न केला, पण...

नाशिक परिसरात गेल्या तीन दिवसांपासून धावत्या वाहनांना आग लागल्याच्या दोन घटना घडल्या आहे. आजही...

नाशिक परिसरात गेल्या तीन दिवसांपासून धावत्या वाहनांना आग लागल्याच्या दोन घटना घडल्या आहे. आजही...

नाशिक परिसरात गेल्या तीन दिवसांपासून धावत्या वाहनांना आग लागल्याच्या दोन घटना घडल्या आहे. आजही...

चांदवड, 13 ऑक्टोबर : नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर द बर्निग कारची अंगावर थरकाप उडणारी घटना घडली आहे. कारमध्ये अडकल्यामुळे चालकाचा जागेवर जळून कोळसा झाला आहे.

नाशिक परिसरात गेल्या तीन दिवसांपासून धावत्या वाहनांना आग लागल्याच्या घटना घडत आहे. भरधाव वेगाने जाणारी एसटी बस आणि केळी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना ताज्या असताना आज भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पेट घेतल्याची घटना चांदवड-पिंपळगाव जवळ  मुंबई-आग्रा महामार्गवर घडली.

संजय चंद्रभान शिंदे (वय 55 रा.साकोरे मिग) हे MH-15,FN- 4177 या मारूती सुझुकी सियाझ (maruti suzuki ciaz) त्यांच्या कार ने साकोरा येथून नाशिककडे जात असतांना कोकणंगाव साकोरा फाट्याजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. कारने पेट घेतल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण कार आगीच्या वेढ्यात सापडली. आग लागल्या नंतर कार लॉक झाली होती. त्यामुळे चालक संजय शिंदे यांना कारमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

कारला आग लागल्यानंतर स्थानिक लोकांची एकच गर्दी उसळली होती. काही जणांनी पुढे जाऊन कारला विझवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आगीची तीव्रता इतकी होती की, कुणालाही पुढे जाता आले नाही.

गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. या कारमध्ये मृत संजय शिंदे यांची पत्नी विमल शिंदे या साकोरा मिग येथील उपसरपंच आहेत. संजय शिंदे यांच्या निधनाची वार्ता पोहोचल्यावर साकोरा मिग गावावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Nashik