मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik News : चांदवडमध्ये कोविड सेंटरला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

Nashik News : चांदवडमध्ये कोविड सेंटरला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

गेल्या तासाभरापासून अग्नितांडव सुरू आहे. या आगीत कोविड सेंटर भक्ष्यस्थानी सापडले आहे.

गेल्या तासाभरापासून अग्नितांडव सुरू आहे. या आगीत कोविड सेंटर भक्ष्यस्थानी सापडले आहे.

गेल्या तासाभरापासून अग्नितांडव सुरू आहे. या आगीत कोविड सेंटर भक्ष्यस्थानी सापडले आहे.

मनमाड, 06 एप्रिल : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये (Chandwad) एका खासगी कोविड सेंटरला (Covid Center) भीषण आग लागली आहे. आजपासूनच हे कोविड सेंटर सुरू होणार होते, मात्र, त्याआधीच कोविड सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.

चांदवड येथील एका खासगी कोविड सेंटरला इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. मनमाडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

आजपासून या सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्यात येणार होते. पण दुपारी अचानक आग लागली.  उद्घाटनाअगोदरच कोविड सेंटरला आग लागली. या कोविड सेंटरच्या खाली असलेल्या फर्निचरच्या दुकानाला आग लागली होती. लाकडी साहित्य असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले फर्निचरच्या दुकानाला लागलेली आग कोविड सेंटर प्रयत्न पोहोचली. गेल्या तासाभरापासून अग्नितांडव सुरू आहे. या आगीत कोविड सेंटर भक्ष्यस्थानी सापडले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मालेगाव,पिंपळगाव, चांदवड,मनमाड येथून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आहे.

First published:

Tags: Covid-19, Death, Fire, Health, Live video, Nashik, Wellness