नाशिक, 01 डिसेंबर : नव्या वर्षाचं स्वागत भारतासह जगभरात धूमधडाक्यात झालं. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यूचं कटेकोरपणे पालन करण्यात आलं. यावेळी नाईट कर्फ्यू आणि सेलिब्रेशनच्या अति उत्साहात असलेल्या तरुणांना मात्र पोलिसांना खाकी इंगा दाखवला आहे. नाशिकमध्ये महिला पोलिसांनी लेडी सिंघमची भूमिका घेत चांगलीच अद्दल घडवली आहे.
नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान नाईट कर्फ्यूचे नियम पायदळी तुडवणाऱ्या तरुणांना लेडी सिंघमने धू-धू धुतलं. इतकंच नाही तर आक्रमक भूमिका घेत लाठ्यांचा प्रसाद दिला. काही तरुणांना भररस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तर काही तरुणांची यथेच्छ धुलाई करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री कर्फ्यूत बिनधास्त फिरणाऱ्या युवकांना महिला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. (1/3) pic.twitter.com/pQMZo97SFm
हे वाचा-पुणेकराला आश्चर्याचा धक्का, तक्रारीसाठी फोन केला आणि समोर निघाले गृहमंत्री
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अतिउत्साही असलेल्या नाशिकमधील काही तरुणांच्या नशिबी लाठ्या-काठ्यांचा मार आणि उठाबशा काढायची वेळ आली. नाईट कर्फ्यूचे नियम मोडणाऱ्या या तरुणांना महिला पोलिसांनी चांगली अद्दल घडवत दांडक्यानं फटकवलं आहे. पोलिसांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. या तरुणांमध्ये केवळ नाईट कर्फ्यूच नाही तर तळीरामांना देखील लाठीचे फटके पडले आहेत. तर वाहन वेगानं चालवणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी भररस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. कान पकडून उठाबशा काढायला लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.