भाजपला सत्ता गमावण्याचा धोका, शिवसेना पालिकेत वापरणार महाशिवआघाडी पॅटर्न?

भाजपला सत्ता गमावण्याचा धोका, शिवसेना पालिकेत वापरणार महाशिवआघाडी पॅटर्न?

नाशिकच्या पंधराव्या महापौर असलेल्या रंजना भानसी यांची महापौरपदाची वाढून दिलेली मुदत संपल्यानंतर आता महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 15 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकांमुळे महापौरांना वाढून दिलेली मुदत संपल्यामुळे आता नगरसचिवांची 22 नोव्हेंबरपूर्वी नव्या महापौरांची निवड करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. नाशिकच्या पंधराव्या महापौर असलेल्या रंजना भानसी यांची महापौरपदाची वाढून दिलेली मुदत संपल्यानंतर आता महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. येत्या 22 नोव्हेंबरला या निवडणुका होणार आहेत. सकाळी 11 वाजता निवडणूक पार पडले. सर्वसाधारण खुल्या गटातील महापौर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांनंतर युती तुटल्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे 8 दिवसांनी कोण महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

भाजप पूर्व नाशिक आमदार बाळासाहेब सानप यांचं पक्षांनं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांचा महापालिकेत प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे 14 नगरसेवक ते फोडू शकतात. जर असं झालं तर भाजप नाशिक रंजना भानसी यांनीदेखील सानपसमर्थक म्हणून पाहिलं जातं. सानप जे सांगतील तेच होईल असं आतापर्यंत महापालिकेत होत राहिलं.

या सगळ्या पार्श्वभूमिवर शिवसेना सानप यांचा मोठा उपयोग करून घेऊ शकते. त्यात सध्या युतीमध्ये ठिणगी पडल्याने आता शिवसेना महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. यासगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, मनसे यांच्या साथीनं शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. यात आता बाळासाहेब सानप यांची भूमिका निर्णायक असणार आहे तर गिरीश महाजन यांची कसोटी पहायला मिळणार आहे.

एकूण जागा 122

- भाजप(स्पष्ट बहुमत)65 होते आता 64

(1 सदस्य सरोज अहिरे राजीनामा देऊन देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी आमदार म्हणून निवडणूक जिंकली)

- शिवसेना 34 होते आता 33

(1 सदस्य दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसे विधानसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण पराभूत झाले)

- काँग्रेस 6

- राष्ट्रवादी 6

- मनसे 5

- अपक्ष 3

- रिपाई 1

एकीकडे आता नाशिकमध्ये शिवसेने काय डाव खेळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर आणि नंतर महायुतीतून शिवसेना बाहेर पडल्यानंतर राज्यात नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी ऐतिहासिक आघाडी स्थापन्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र याबाबत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

शिवसेनेसोबत काँग्रेस नेते थेट चर्चा करत असल्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. कारण काँग्रेसच्या नेतृत्वाकडून राज्यातील नेतत्वाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र राज्यातील नेते थेट शिवसेनेसोबत चर्चा करत आहे. याच कारणामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जवळपास तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यात नव्या सरकारची स्थापना होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्रिपवरून भाजपसोबत बिनसल्यानंतर शिवसेनेनं आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तावाटपाची बोलणी सुरू केली आहे. मात्र राज्यात सत्तास्थापनेसाठी पहिल्यांदाच अशी आघाडी होत असल्याने चर्चेला उशीर होत आहे. त्यातच आता एका मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एका मुद्द्यावरून मतभेद झाल्याची माहिती आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

मंत्रिपदांच्या वाटणीवरून शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सहमती नसल्याची माहिती आहे. मंत्रिपदाबाबत शिवसेनेनं 16- 14- 12 च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच 14-14-14 अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे सत्तावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या