पेट्रोल आणि डिझेलचा वापर न करता नाशिकमध्ये धावणार बस

पेट्रोल आणि डिझेलचा वापर न करता नाशिकमध्ये धावणार बस

ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्या नंतर जवळपास 150 इलेक्ट्रीक बसेस नाशिक मध्ये दाखल होणार आहेत.

  • Share this:

नाशिक 18 ऑगस्ट : पेट्रोल आणि डिझेलच्या प्रदुषणामुळे जगभर अनेक समस्या निर्माण होताहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याकडे सगळ्यांचा कल वाढतोय. प्रदुषणात सगळ्यात जास्त वाटा असतो तो वाहनांमधून निघणाऱ्या धुराचा. या धुरातल्या विषारी कणांमुळे फक्त हवेचं प्रदुषणच होत नाही तर अनेक आजारांचा विळखाही पडत आहे. यावर उपाय म्हणून इलेक्ट्रीक बसेसचा पर्याय पुढे येत असून नाशिकमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचा वापर न करता इलेक्ट्रीक बस धावणार आहे.

मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माय लेकरांच्या सुटकेचा थरार!

गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेली नाशिकमधल्या इलेक्ट्रीक बसची आज नाशिकच्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात आली. नाशिक महापालिकेअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्या नंतर जवळपास 150 इलेक्ट्रीक बसेस नाशिक मध्ये दाखल होणार आहेत. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज या इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली. ह्या चाचणीच्यावेळी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

सावधान...'पोलीस' असल्याचं सांगून लुटमार करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

अत्यंत आधुनिक पद्धतीनं ह्या बसची निर्मिती करण्यात आली असून ही बस वातानुकूलित असल्यानं प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. या बस मध्ये विशिष्ट पद्धतीची बॅटरी असून एका ठराविक वेळेपर्यंत ही बॅटरी चार्ज केल्यानंतर ही इलेक्टरीक बस जवळपास 225 किलोमीटर इतके अंतर पार करू शकते. ही बस बॅटरी वर चालत असल्यानं प्रदूषण होत नाही.  याशिवाय अत्याधुनिक आणि दिसण्यास आकर्षक असल्याने शहराच्या सौंदर्यातही भर घालणारी ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या