Elec-widget

गिरीश महाजनांची खेळी यशस्वी, भाजपचा महापौर.. महाविकासआघाडीला मोठा धक्का

गिरीश महाजनांची खेळी यशस्वी, भाजपचा महापौर.. महाविकासआघाडीला मोठा धक्का

शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान करत घेतली माघार..

  • Share this:

प्रशांत बाग,(प्रतिनिधी)

नाशिक,22 नोव्हेंबर: राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे समीकरण जुळत असताना नाशकात महापौर, उपमहापौर निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान करत माघार घेतल्याने नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची तर भीखुबाई बागुल यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महापौरांच्या नावाची ऑनलाइन घोषणा केली.

मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर

नाशिक महापालिका महापौर, उपमहापौर पदीची निवडणूक राज्यातील नव्या सत्ता समीकरणाची नांदी समजली जात आहे. महापालिका निवडणूक अखेरचे तास रंगतदार ठरला. महाविकासआघाडीला मतदानापूर्वीच फटका

बसला. काँग्रेसचे नगरसेवक ऐनवेळी महाविकासआघाडीतून बाहेर पडले. त्यामुळे भाजपची दावेदारी मजबूत झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवकही शेवटपर्यंत तळ्यात मळ्यात होते. भाजपवरील संकट घालवण्यासाठी भाजपचे 'संकटमोचन' नेते गिरीश महाजन यांनी अथक परिश्रम घेतल्याचे बोलले जात आहे. नाशकात मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर निवडून आला आहे. मनसेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ दिली.

Loading...

भाजपचे फुटीरांचे बंड झालं थंड..

सत्ताधारी भाजपच्या 10 नगरसेवकांना या महाविकासआघाडीने आपल्या तंबूत घेऊन धक्का देण्यासाठी रणनीती आखली होती. दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी भाजपने मनसेसोबत घरोबा केला. भाजपमधून फुटलेले सर्व नगरसेवक पुन्हा भाजपात परत आले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांची सहल, मोठा घोडेबाजार, नगरसेवकांची पळवापळवी अशा नाट्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. शुक्रवाकी अखेर या नाट्याच्या तिसरा अर्थात अखेरचा अंक पाहायला मिळणार आहे. एकंदरीत राज्यात होणाऱ्या महाविकासआघाडीच्या प्रयोगाची ही ट्रायल मानली जात आहे.

सत्ताधारी भाजप काहीशी अडचणीत आली आहे. कारण भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या सगळ्या सत्तासमीकरणात मनसेची भूमिका निर्णायक ठरली. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला साथ दिली. मात्र, शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान केली आणि भाजपला यश मिळवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com