Elec-widget

महापौरपदासाठी भाजप-सेनेत चढाओढ, नाशिककरांनी ठणकावून सांगत केली 'ही' मागणी

महापौरपदासाठी भाजप-सेनेत चढाओढ, नाशिककरांनी ठणकावून सांगत केली 'ही' मागणी

नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 22 तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पालिकेत बहुमत असलेल्या भाजप बरोबरच शिवसेनेनंही आपला महापौर बसविण्याचा दावा केला आहे

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 18 नोव्हेंबर : नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असताना या चढाओढीत नाशिकमधील विविध संघटनांनी 'मी नाशिककर' या बॅनरखाली एकत्र येत सुशिक्षित महापौर देण्याची मागणी केली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 22 तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी महानगरपालिकेत बहुमत असलेल्या भारतीय जनता पार्टी बरोबरच शिवसेनेनंही आपला महापौर बसविण्याचा दावा केला आहे. राजकीय पक्षांचे हे दावे-प्रतिदावे सुरू असताना आता नाशिकमधील विविध संघटनांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी सुशिक्षित महापौर द्यावा अशी मागणी केली आहे.

यासाठी 'मी नाशिककर' या बॅनरखाली नाशिकमधील औद्योगिक, बांधकाम,वैद्यकीय,ट्रांसपोर्ट अशा सर्वच क्षेत्रातील संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बैठकही घेतली. या बैठकीत सर्वच पदाधिकार्यानी निमाचे विद्यमान अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या नावावर एकमत दर्शवत जाधव यांना महापौर करावं अशी मागणी केली आहे.

महानगर पालिकेचं महापौरपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आल्याने पालिकेतील सर्वच बड्या पदाधिकार्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पालिकेत भाजपकडे बहुमत असल्याने महापौरपदावर भाजपचा दावा अधिक प्रबळ आहे. त्यामुळे नाशिक शहरातील या विविध क्षेत्रातील संघटनांनी भाजप नगरसेवक आणि उद्योजक शशिकांत जाधव यांचं नाव महापौरपदासाठी जाहीर करण्याची मागणी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या पदाधिकाऱ्यांची एक टीम यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेणार आहे.

Loading...

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 11:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com