भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या गोटात, नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी

भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या गोटात, नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी

शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तर दुसरीकडे भाजप आणी मनसे हे नवीन समीकरण जन्माला आलं आहे.

  • Share this:

नाशिक, 20 नोव्हेंबर : नाशिक पालिका महापौर निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता. राजकीय पटलावर एकमेकांना पाण्यात पाहणारे सगळेच पक्ष आज पालिकेत आमने सामने होते. एकीकडे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तर दुसरीकडे भाजप आणी मनसे हे नवीन समीकरण जन्माला आलं आहे.

नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपमधील बाळासाहेब सानप समर्थक आज खुलेपणानं शिवसेनेसोबत अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. शिवसेनेनं दाखल केलेल्या अर्जात आज कट्टर सानप समर्थक कमलेश बोडखे यांनी उपमहापौरपदासाठी आपला अर्ज दाखल केल्यानं मोठी खळबळ माजली.

दरम्यान, नाशिक महापालिकेत भाजप-मनसे असे नवे समीकरण समोर येताना दिसत आहे. शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजपने मनसेसोबत घरोबा केला आहे. मनसे आपल्यासोबत असल्याचा दावा भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी केला आहे. मनसे कार्यालयात काल मंगळवारी भाजप-मनसे नेत्यांची बैठक झाली होती. तसेच नाशकात महाशिवआघाडीसोबत मनसे नाही, हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुले भाजपसोबत पुन्हा एक ठाकरे (राज) येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र

नाशिक महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचा दावा काँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी केला आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचे शाहू खैरे यांनी सांगितले आहे

काँग्रेसने भरला महापौर-उपमहापौर पदाचा अर्ज

काँग्रेसने महापौर-उपमहापौर पदाचा अर्ज भरला आहे. राहुल दिवे यांचा महापौर पदासाठी तर शाहू खैरे यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे. मात्र, मनसेची भूमिका किंगमेकरची असून मनसेने भाजपसोबत घरोबा केल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 05:27 PM IST

ताज्या बातम्या