मनमाड, 18 डिसेंबर : नाशिकच्या ग्रामीण भागात अपघाताची मालिका सुरूच असून सकाळी चांदवडला बस-ट्रकचा अपघात होऊन काही तास उलटत नाही तोच मनमाडला पुणे-इंदौर मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात झाला आहे.
ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. कार मालकाला तर दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले. मात्र नशीब बलवत्तर होते म्हणून कोणीही जखमी देखील झाले नाही. कारमधील सर्व जण सुखरूप असल्याचे पाहून काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी आली.
हेही वाचा - रागामुळे गमावला जीव! कारचालकाला मारण्याचा प्रयत्न करीत होता दुचाकीस्वार आणि...भयंकर घटनेचा CCTV VIDEO
दरम्यान, गेल्या काही दिसांपासून महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्ते रुंद झालेले असतानाही अपघातांच्या घटनांमध्ये होणारी वाढ प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. वेगावर नियंत्रण राहात नसल्यानेच अपघाताच्या बहुतांश घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे वाहन चालकांनी रस्त्यावर इतर सर्व नियमांचं पालन करत असतानाच वेगावरही नियंत्रण ठेवावं, असं आवाहन करण्यात येत आहे.