मनमाड, 21 नोव्हेंबर : बळीराजावर कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट असतंच या सगळ्यातून सावतर तो पुन्हा उभा राहातो पण त्याच्या हाती कवडीमोल भाव येतो. अशावेळी उद्विग्न झालेल्या बऴीराजानं आपलं बाजारात विक्रीसाठी आलेलं पिक संतापानं गायी-म्हशींना खायला दिलं आहे. जुन्नर नंतर आज मनमाडमध्ये शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी कवडीमोल भाव मिळत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. कष्टानं पिकवलेल्या भाजीचे दर निम्मेही मिळत नसल्यानं अखेर शेतकऱ्यानं भाजी रस्त्यावर फेकून दिली आहे.
सध्या मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातील बाजार समित्यासह किरकोळ बाजारात सर्वच भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर निम्म्याहूनही खाली उतरल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. मेथी, कोथिंबीर, शेपूच्या भाज्या तर अक्षरश: 1 रुपयाने जुडी बाजारात 1 रुपयानं देखील विकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत.
मेथी आणि शेपूची जुडी बाजारात 1 रुपयाला देखील घ्यायला कोणी तयार नाही त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून निराश झालेल्या मनमाडच्या रापली गावातील संतोष राजनोर या शेतकऱ्याने उभ्या शेतात जनावरे सोडून दिली. तर दुसऱ्या शेतकऱ्याने मेथीची भाजी रस्त्यावर टाकून निघून गेला.
कष्टानं पिकवलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतात जनावरं सोडली... मनमाड, प्रतिनिधी- बब्बू शेख pic.twitter.com/eYjtutE2xY
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) November 21, 2020
हे वाचा-Anti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार
जुन्नरमध्ये गुरुवारपासून भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं तिथल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर रस्त्यावर भाजी फेकून दिली. तर काही शेतकऱ्यांनी ही भाजी जनावरांना खायला दिली. मोठ्या कष्टानं कोरोना, लॉकडाऊन महापूर या सगळ्या संकटातून सावरत पिक उभं केलं आणि त्याला कवडीमोलही भाव मिळत नसल्यानं शेतकरी निराश झाला आहे. शेतकऱ्यानं भाजी रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला आहे.