मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भयंकर! भर चौकात तरुणाला टोळीकडून जीवघेणी मारहाण, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

भयंकर! भर चौकात तरुणाला टोळीकडून जीवघेणी मारहाण, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

पोलिसांना 7 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. तर चार जण अद्यापही फरार आहेत.

पोलिसांना 7 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. तर चार जण अद्यापही फरार आहेत.

पोलिसांना 7 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. तर चार जण अद्यापही फरार आहेत.

मनमाड, 14 मार्च : पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ उत्तर प्रदेश किंवा बिहार इथला नसून नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील असल्याचं सांगितलं जात आहे. 3 ते 4 जणांनी अत्यंत निर्दयीपणे लाठा-काठ्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. दोन गटात गेल्या काही वर्षां पासून वाद होताच. हा वाद इतका विकोपाला गेला की 3 ते 4 जणांनी मिळून या एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांनी दिली. काठ्यानी एका टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मनमाडच्या डॉ. आंबेडकर चौकात घडली. पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तर 4 जण अद्यापही फरार आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 11 जाण विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर पोलिसांना 7 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता किती अमानुषपणे मारहाण केली आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात सध्या पोलिसांकडून चौकशी करत आहेत तर 4 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे वाचा-देवदूत ठरला खार्दी वर्दीतील पोलिसवाला! 88 जणांचे वाचवले प्राण
First published:

पुढील बातम्या