Home /News /maharashtra /

मुंबई-आग्रा महामार्गावरील भीषण अपघात कारचा चक्काचूर, 2 जागेवरच ठार

मुंबई-आग्रा महामार्गावरील भीषण अपघात कारचा चक्काचूर, 2 जागेवरच ठार

नाशिकच्या ग्रामीण भागात अपघाताची मालिका सुरूच आहे.

मालेगाव, 22 डिसेंबर: नाशिकच्या (Nashik) ग्रामीण भागात अपघाताची मालिका सुरूच आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ खासगी बस आणि गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या भीषण अपघाताला काही तास उलटत नाही तोच उमरानेजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाच उपचारादरम्यान असे 3 जणांचा मृत्यू झाला. सध्या दाट धुक्यामुळे नाशिक जिल्ह्यात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचं बोललं जात आहे. दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण आहे की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त कार मालेगावकडून नाशिकडे जात होती. हेही वाचा..भरधाव बसनं सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला चिरडलं, तरुण जागेवरच ठार देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी, 21 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास उमराणे गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या दिशेने जात असलेली तवेरा कार (एम एच 15 सी एम 7712) हिने ट्रक (एमएच 43 इ 1806 ला) मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघात तवेरा मधील दोन जण जागेवरच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतक दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, अद्याप देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आली नाही. मॉर्निग वाक करणाऱ्या व्यक्तीचा चेंदामेंदा... दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बस आणि गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. अपघात एवढं भयंकर आहे की, बसनं महामार्गाच्या कडेला उभी असलेली टॅक्सी आणि 2 टपऱ्यावर जाऊन पलटी झाली. मॉर्निग वाक करणारा एका व्यक्तीचा बसखाली दबून मृत्यू झाला होता. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ मजूर घेऊन जाणारी खासगी बस, गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि टॅक्सी यांचा विचित्र भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस महामार्गाच्या कडेला पलटी झाली. यात बससह रस्त्याच्या कडेला उभी असलेली टॅक्सी आणि दोन टपऱ्याचं मोठं नुकसान झालं. हेही वाचा...कोरोना नाही, निवडणुका नाही; भारतीयांच्या गुगल सर्चमध्ये ही गायिका बसमध्ये 75 मजूर होते. सुदैवानं ते थोडक्यात बचावले. काही मजुरांनी किरकोळ दुखापत झाली. जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आलं आहे. धुकेमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. ट्रकमध्ये ही गॅस सिलेंडर होते. गॅस गळती झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Nashik, Road accident, अपघात, नाशिक, मालेगाव

पुढील बातम्या