Home /News /maharashtra /

BREAKING : खुलं होणार महाराष्ट्रातलं हे मोठं शहर; लग्नसोहळ्यांनाही दिली सशर्त परवानगी

BREAKING : खुलं होणार महाराष्ट्रातलं हे मोठं शहर; लग्नसोहळ्यांनाही दिली सशर्त परवानगी

महाराष्ट्रात Lockdown3 चे नियम हळूहळू शिथिल होत आहेत. मुंबई, पुणे सोडता इतर राज्यात जनजीवन सामान्य होण्याच्या दृष्टीने काही प्राथमिक पावलं उचलली जात आहेत. त्यात एक मोठा निर्णय आला आहे.

नाशिक, 5 मे : महाराष्ट्रात Lockdown3 चे नियम हळूहळू शिथिल होत आहेत. मुंबई, पुणे सोडता इतर राज्यात जनजीवन सामान्य होण्याच्या दृष्टीने काही प्राथमिक पावलं उचलली जात आहेत. त्यात एक मोठा निर्णय नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. नाशिक (Nashik lockdown) शहरात प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) सोडता इतर ठिकाणी सगळी दुकानं सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. फक्त जीवनावश्यक नव्हे, तर सर्वच दुकानं सुरू करण्याला परवानगी देताना जिल्हाधिकाकारी सूरज मांढरे यांनी काही नियम घातले आहेत. सर्व दुकानदारांवर सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक राहील. हा आदेश न पाळल्यास दुकान पुन्हा बंद करण्याच्या सूचना देण्यात येतील, असंही मांढरे यांनी स्पष्ट केलं आहे. दुकानात सुरक्षित अंतर ठेवण्याची आणि गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी दुकानदारांची राहील, असंही त्यांनी आदेशात म्हटलं आहे. वाचा - पुणेकरांना मोठा दिलासा! सामान्यांनाही हे नियम पाळून मिळणार इंधन महत्त्वाचं म्हणजे लग्नसोहळ्यांना प्रथमच परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात छोट्या प्रमाणात विवाह सोहळा करता येणार आहे. जास्तीत जास्त 50 लोकांचा समावेश असलेला लग्न सोहळा करता येणार आहे. आहेत त्याच ठिकाणी लग्न समारंभ करावा, असंही म्हटलं आहे. लग्नासाठी प्रवास करता येणार नाही. जिल्हाबंदीचे नियम लागू आहेत. हे सर्व बदललेले नियम ज्या भागात कोरोना रुग्ण नाहीत, त्या भागासाठी आहेत. नाशिक जिल्ह्यात ज्या भागात कोरोना रुग्ण सापडले आहेत, ते प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. त्या क्षेत्रात जुनेच नियम लागू असतील. तिथला लॉकडाऊन पूर्वीसारखाच फक्त अत्यावश्यक सेवांपुरता मोकळा होईल. अन्य दुकानं बंदच राहतील. सर्व दुकानं उघडण्याचा आदेश देताना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दारूच्या दुकानाबाबत मात्र स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. दारू दुकानांबाबत एक्साईज विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं मांढरे म्हणाले. अन्य बातम्या हायड्रोक्लोरोक्विन की रेमडेसिवीर... कोणतं औषध कोरोनावर प्रभावी? शर्थीचे प्रयत्न, कोरोनाची लस तयार करण्यासाठी तब्बल 100 संशोधन गटांकडून काम सुरू World Asthma Day : अस्थमा अटॅक टाळण्यास मदत करतील 'हे' पदार्थ
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या