मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दारूच्या नशेत तरुण थेट विषारी नागालाच भिडला, अंगावर काटा आणणारा VIDEO

दारूच्या नशेत तरुण थेट विषारी नागालाच भिडला, अंगावर काटा आणणारा VIDEO

नागाला पाहताच तरुण नागाजवळ गेला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्याच्याशी खेळू लागला.

नागाला पाहताच तरुण नागाजवळ गेला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्याच्याशी खेळू लागला.

नागाला पाहताच तरुण नागाजवळ गेला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्याच्याशी खेळू लागला.

नाशिक, 12 मार्च : दारूचं सेवन जास्त प्रमाणात झालं की माणूस स्वत:वरचं नियंत्रण गमावतो आणि या स्थितीत तो काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. असाच काहीसा अजब प्रकार लासलगाव (Lasalgaon) जवळ असलेल्या नांदूरमध्येश्वर येथे घडला. या परिसरातील जिल्हा परिषदेच्या आवारात मोठा विषारी नाग (Snake) आढळून आला.

नाग असो अथवा साप... त्याला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. फणा काढून बसलेल्या नागाला पाहून उपस्थितामध्ये खळबळ उडाली. नागाला कसं जेरबंद करायचं असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना तेथून मद्यधुंद अवस्थेत मंगेश भाऊसाहेब गायकवाड हा तरुण जात होता. त्याने नागाला पाहताच मी नागाला पकड़तो असं सांगत तो नागाजवळ गेला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्याच्याशी खेळू लागला.

एक दारुडा आपल्याशी मस्ती करत असल्याचे पाहून नाग देखील संतापला आणि त्याने मंगेशला चावा घेतला. नागाने चावा घेतल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी मंगेशची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत असलेल्या मंगेशने कोणाचेही न ऐकता नागाला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागाने पुन्हा त्याला चावा घेतला.

हेही वाचा - ..अन् डोळ्यांसमोर 12 लाख झाले जळून खाक, नागरिकांनी व्यक्त केला संताप

तब्बल चार वेळा मंगेशने नागाला डिचवले अन् नागानेही त्याला आपले खरं रूप दाखवत प्रत्येकवेळी चावा घेतला. नागाने चार वेळा दंश केल्यामुळे मंगेशवर विषाचा परिणाम होऊन तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने निफाडच्या ग्रामीण रुग्णलायत दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मंगेशची प्रकृती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

दारूच्या नशेत मंगेशने नागाशी पंगा घेतला, मात्र नागाने देखील पंगा घेणाऱ्याला मंगेशला तब्बल चार वेळा दंश मारून इंगा दाखवत थेट त्याला मृत्यूच्या दारात नेऊन ठेवले. त्यामुळे दारू प्यायल्यानंतर आपण कोणाशी पंगा घेतो याचे भान ठेवले पाहिजं, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

First published:

Tags: Nashik, Snake, Snake video