भयंकर! महिलेला झोपेतच बिबट्याने ओढून नेले, गळ्याचा लचका तोडल्याने झाला मृत्यू

भयंकर! महिलेला झोपेतच बिबट्याने ओढून नेले, गळ्याचा लचका तोडल्याने झाला मृत्यू

पहाटेच्या सुमारात बिबट्याने भोराबाई यांना झोपेतून ओढून नेले.

  • Share this:

इगतपुरी, 8 ऑगस्ट : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथील रहिवासी भोराबाई महादु आगीवले या 65 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भोराबाई यांनाबिबटयाने ओढून नेले. त्यानंतर घरापासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर तिचा मृतदेह वन विभागाला व पोलिसांना आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

इगतपुरी शहरापासून 7 कि.मी. अंतरावर असलेल्या चिंचलेखैरे येथे आपल्या राहत्या घरात 7 ऑगस्ट रोजी रात्री जेवन आटपून मुलगी , जावई व मुलं हे घरात आत झोपले होते आणि घरासमोर भोराबाई ह्या झोपल्या होत्या. तेव्हा पहाटेच्या सुमारात बिबट्याने भोराबाई यांना झोपेतून ओढून नेले आणि त्यांची मान , छातीचा भाग खाऊन जंगल भागात टाकून दिले.

सकाळी घरातील इतर लोक उठल्यावर बाहेर भोराबाई अंथरूणात दिसल्या नाहीत म्हणून आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरू करण्यात आली. तेव्हा एका ठिकाणी झाडांच्या झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत त्या दिसून आल्या. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस व वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करीत ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे.

मयत महिलेचे शव विच्छेदनाची सोय इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात नसल्याने शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग या भागात सापळा रचून पिंजरा आणि कॅमेरे लावणार आहे. या भागातील गावकऱ्यांनाहि सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वन विभाग अधिकारी रमेश डोमसे यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 8, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading