VIDEO : बस विहिरीत कशी पडली? बचावलेल्या महिलेची अंगावर शहारे आणणारी प्रतिक्रिया

VIDEO : बस विहिरीत कशी पडली? बचावलेल्या महिलेची अंगावर शहारे आणणारी प्रतिक्रिया

नाशिकमध्ये कळवणजवळ एसटी महामंडळाची बस आणि रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे

  • Share this:

नाशिक, 28 जानेवारी :  नाशिकमध्ये कळवणजवळ एसटी महामंडळाची बस आणि रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 19 प्रवाशी बेपत्ता आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

या बस अपघातातून बचावलेल्या महिलेनं नेमकं काय घडलं याची माहिती दिली.

'दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दल कळालचं नाही. फक्त विहिरीकडे बस जाताना दिसली होती.  विहिरीमध्ये बस पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. आम्ही जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होतो. लहान-लहान मुलं होती. सगळे जण वाचवा वाचवा ओरडतं होती. मी कशी बशी खिडक्याला पकडून बाहेर आली.'

आतापर्यंत 20 प्रवाशांचा मृत्यू

कळवण आगारची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. दुपारी 3.30 च्या सुमारास धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ बस पोहोचली असता अचानक टायर फुटले. त्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.  त्याचवेळी समोरून येणाऱ्या  एका अॅपे रिक्षाला बसने धडक दिली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या परिसरात वळली. तिथूनच जवळ एक विहीर होती.  त्यावेळी बस थेट रिक्षाला फरफटत नेते विहिरीच्या कठड्याला धडकली. मात्र, बसचा वेग जास्त असल्यामुळे कठडा तोडून  बस आणि रिक्षा विहिरीत कोसळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

या बसमध्ये 43 प्रवाशी होते आणि यात 7 मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत या अपघातात मृतांची संख्याही 20 वर पोहोचली आहे. तर 19 जण जखमी झाले आहे. अजूनही 19 जण बेपत्ता आहे.

First published: January 28, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading