लव्हस्टोरीचा भयानक अंत, प्रियकरासह नव्या प्रेयसीवर गुन्हा दाखल

लव्हस्टोरीचा भयानक अंत, प्रियकरासह नव्या प्रेयसीवर गुन्हा दाखल

वाद टोकाला गेला आणि प्रेयसीने थेट गळफास घेत आत्महत्या केली.

  • Share this:

नाशिक, 6 फेब्रुवारी : प्रेमसंबंधातून तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. प्रेमसंबंधात प्रियकराने नव्या प्रेयसीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याने संतापलेल्या जुन्या प्रेयसीने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.

प्रेमसंबंधांत असलेल्या तरुण-तरुणीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. प्रियकर दुसऱ्या मुलीशी जवळीक साधत असल्याचा त्या तरूणीचा आरोप होता. त्यातून मग या दोघांमध्ये सतत वाद होत होते.

हाच वाद टोकाला गेला आणि प्रेयसीने थेट गळफास घेत आत्महत्या केली. आता या आत्महत्येप्रकरणी संबंधित तरुणीच्या प्रियकरासह त्याच्या नव्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांनी या प्रियकरासह त्याच्या नव्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणांतून आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत त्यामुळे तरुणाईने विचारपूर्वक आपल्या जीवनसाथीदाराची निवड करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहेत.

VIDEO : तोडपाणीचे आरोप सिद्ध करूनच दाखवा, धनंजय मुंडेंचं खुलं आव्हान

First published: February 6, 2019, 11:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading