नाशिक, 3 मार्च : त्रंबकेश्वरमधील सापगावमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गोकुळ दिवे असं मयत तरुणाचं नाव आहे. आपआपसातील वादातून मित्रांनीच हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सापगावपासून काही अंतरावर मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात धारदार शस्त्राने वार गोकुळ दिवे या तरुणाची हत्या करण्यात आली. ही हत्या मध्यरात्रीच्या सुमारास झाली. मात्र सकाळ झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. तरुणाच्या हत्येमुळे सापगाव परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
त्रंबकेश्वर पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र या प्रकरणात मृत तरुणाच्या मित्रांकडेचे संशयाची सुई वळाल्याने गूढ निर्माण झालं आहे. मित्रांनी खरंच गोकुळ दिवे या तरुणाचा खून केला का? केला असेल तर कोणत्या कारणामुळे त्यांनी हे पाऊल उचललं? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.
हेही वाचा- वडिलांची हत्या करून 10 वीतील मुलाने घरातच पुरला मृतदेह, 2 महिन्यांनंतर झाला उलगडा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अशीच एक घटना समोर आली आली होती. पिंपरी चिंचवडमध्ये जिवलग मित्रानेच तरुणाचा खून केला होता. आपला छंद पूर्ण करण्यासाठी एका मित्रानेच त्याच्या जिवलग मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली होती. मित्रत्वाच्या नात्याल्या काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.