19 डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात जगदीश बहीरु शिरसाठ या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि याच शेतकऱ्याच्या खिश्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेली चिट्ठी सापडली. यात शेतकऱ्यानं जिल्हा बँकेवर गंभीर आरोप केला होता. बँक प्रोत्साहन कर्जाच्या मंजूर रक्कमेतून दरमहा फक्त हजार रुपये देत असल्याच्या या आरोपानं चांगलीच खळबळ माजली. आता या प्रकरणानं भलतंच वळण घेतलंय.तो शेतकरी कर्जदारचं नव्हता असा जिल्हा बँकेचा खुलासा केल्यानं या चिट्ठी प्रकरणाचं गुढ वाढलंय.
हीच आहे ती चिट्ठी. जी आत्महत्याग्रस्त जगदीश शिरसाठ या शेतकऱ्याच्या खिशात सापडली. 'मुख्यमंत्री महोदय, आम्हाला तुम्ही कर्जमाफी अनुदान दिले मात्र ते बँकेतून वेळेवर मिळत नाही, शेतीचे कर्ज,नैसर्गिक आपत्ती यामुळे मोठा त्रास होतोय, माझी पत्नी सुरेखा हिला शासनाकडून न्याय मिळावा' असा मजकूर असल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र हा शेतकरी कर्जदारच नव्हता असा खुलासा बँकेनं केल्यानं या प्रकरणातील गुढ वाढलंय.
आपल्या सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हा बँकेत बोलावली होती. नेमकं तथ्य काय आहे याची वादळी चर्चा या बैठकीत झाली. अखेर मयत जगदीश नाही तर त्याचा भाऊ आणि वडिलांच्या खात्यावर अनुदान वर्ग झाल्याचं सांगण्यात आलं.
जिल्हा बँकेच्या याच शाखेतून महिना 1000 रुपये घ्या असा आरोप या चिट्ठीत आहे. मात्र आता,ही चिट्ठी खरोखर मयत शेतकऱ्यानं लिहिली की दुसऱ्या कोणी लिहून त्याच्या खिश्यात टाकली याचा शोध आता पोलीस घेताय.