Home /News /maharashtra /

मुंबईनंतर नाशिकला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 3.2 नोंदली गेली तीव्रता

मुंबईनंतर नाशिकला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 3.2 नोंदली गेली तीव्रता

एकीकडे देशावर कोरोनासारख्या अदृश्य रोगाचे संकट असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात भूकंपाचे धक्के बसत आहेत.

    नाशिक, 09 सप्टेंबर : एकीकडे देशावर कोरोनासारख्या अदृश्य रोगाचे संकट असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज पहाटे नाशिकमध्ये 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी पहाटे 4.17 च्या सुमारास नाशिकमध्ये भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (NCS) म्हणण्यानुसार, आज पहाटे नाशिकच्या 93 किमी पश्चिमेस 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. याआधी मंगळवारी पहाटे अंदमान आणि निकोबार बेटांवर पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार अंदमान आणि निकोबार बेटांमधील दिगलीपूरच्या पूर्व-दक्षिणपूर्व 20 किलोमीटर अंतरावर झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 मोजली गेली. पहाटे 3 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पहाटे 3.20 वाजता आणखी एक भूकंप जाणवला. पोर्टब्लेअर येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 20 किलोमीटर होती. तर, मंगळवारीच लडाखच्या कारगिलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 5.47च्या सुमारास 4.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी सोमवारी पहाटे मुंबईतही हलके भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबईपासून 102 किलोमीटर उत्तरेस होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या