'मला तुम्ही खूप आवडता' म्हणणाऱ्या डॉक्टरविरोधात महिलेची तक्रार, गुन्हा दाखल होताच बिल्डिंगवरून मारली उडी

'मला तुम्ही खूप आवडता' म्हणणाऱ्या डॉक्टरविरोधात महिलेची तक्रार, गुन्हा दाखल होताच बिल्डिंगवरून मारली उडी

डॉक्टरने सातव्या मजल्याच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली.

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक, 14 जानेवारी : विनयभंगाचा आरोप झाल्यानं डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमधील सिन्नर इथं घडली आहे. महिला रुग्णाच्या तक्रारीनंतर नाशिकमधील एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरने सातव्या मजल्याच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली.

पीडित महिला रुग्ण पित्ताचा त्रास होत असल्यानं डॉक्टर गोविंद गोरे यांच्या स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. उपचार घेत असतांना डॉक्टर गोरे यांनी 'मला तू खुप आवडते' असं म्हटलं. त्यानंतर पीडित महिलेने सिन्नर पोलिसांत तक्रार दिली होती.

बीडमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीचा प्रकार उघड झाल्याने खळबळ, दोन अश्लील VIDEO झाले अपलोड

महिला रुग्णाच्या तक्रारीनंतर सिन्नर पोलिसांनी डॉक्टर गोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अवघ्या चार ते पाच तासात डॉक्टर गोरे यांनी आत्महत्या केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. गोरे प्रचंड तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

गर्लफ्रेंडसमोर पगार विचारला म्हणून वैतागलेल्या तरुणाने थेट रॉडने केली मारहाण

दरम्यान, विनभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आलेल्या डॉ. गोरे यांच्या आत्महत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: January 14, 2020, 12:21 PM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading