नाशिकमध्ये जिल्हा बँकेने गोठवली 60 हजार शेतकऱ्यांची खाती!

नाशिकमध्ये जिल्हा बँकेने गोठवली 60 हजार शेतकऱ्यांची खाती!

nashik district bank frozen 60 thousand Farmers accounts

  • Share this:

12 एप्रिल : राज्यातला शेतकरी  कर्जमाफीच्या आशेवर शेतकरी असतानाच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार असलेल्या 60 हजार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांची बँक खातीच कर्जाशी लीन करून घेतल्याने खाते गोठवल्यात जमा आहेत. त्यामुळे खात्यावर असलेली उरलीसुरली 25 ते 50 हजारांची रक्कमही शेतकऱ्यांना काढता येत नाही.

शेतकऱ्यांच्या चालू खात्यातील रकमा आणि त्यांच्या बँकेतील मुदतठेवी असे सुमारे 165 कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. कोणत्याही शेतकऱ्याची रक्कम कर्जाकडे वळती केली जाणार नसल्याचे सांगत संचालक सारवासारव करीत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी बँकेने साडेपाच लाख खातेदारांना तब्बल 1,719 कोटींचे कर्जवाटप केले होते. मात्र, दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांनी बँकेत कर्जाची परतफेडच केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading