नाशिक, 30 नोव्हेंबर : मुलगी जन्माला आली ही कोणाची चूक पालकांची की तीची अवघ्या काही तासांच्या अर्भकाला नाशिकमध्ये रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आई- बापाने उमजलेल्या कळीला खुडण्याच्या प्रयत्न केला आहे. ती नकोशी झाल्याने तिला अवघ्या काही तासात फेकून दिल्याची बाब समोर आली आहे. मुलगी झाली म्हणून क्रूर आई बाबाने तिला पिशीवीत बांधून रस्त्यावर फेकल्याचा धक्कादायक कृत्य केलं आहे.
नाशिक शहरात राहणाऱ्या दाम्पत्याने घरातून बाहेर पडत आणि चालता-चालता रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखे फेकून दिल्याने शहरातील सगळ्यांचाच संताप झाला आहे. अशातच नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडल्याने अवघ्या काही तासांची चिमुकली रडत राहिली, मात्र, क्रूर आई-बापाला तीची दया आली नाही. तीचं आयुष्य अवघ्या काही तासांचचं होत तिच्या रडण्याच आवाज कुत्र्यांनी भेदत संधी साधली.
हे ही वाचा : विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने घेतलं विष, जिल्हाधिकाऱ्यांनी लावला डोक्याला हात
रडत असलेल्या बाळाचे हाताचे आणि पायाचे लचके कुत्र्यांनी तोडल्याने ज्या ठिकाणी चिमुकलीला टाकलं होतं त्या ठिकाणी रक्तस्राव झाल्याने बाळाचा मृत्यू झाला होता. यामध्ये संतापजनकआणि तितकीच धक्कादायक घटना पोलीसांच्या तपासात समोर आली आहे.
ही घटना काल (दि. 29) मंगळवारी समोर आली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत. पोलिसांनी पंचनामा केला यावेली पोलिसांनाही या घटनेची भीषणता लक्षात आल्याने त्यांनीही हळहळ व्यक्त केली. जन्मदात्यांनाच ती नकोशी झाल्याची बाब सीसीटीव्हीमुळे उजेडात आल्याने क्रूर आई-वडिलांवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान नाशिककरांनी तिच्या पालकांवर कठोर कारवाई करावी अशी होऊ लागली आहे.
हे ही वाचा : श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही, पॉलीग्राफ टेस्टनंतर आफताबची कबुली
मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी रात्री तिचा जन्म झाला होता. अवघ्या काही तासांत आई-वडिलांनी मुलगी झाली म्हणून पिशवीत कोंबून रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखे फेकून दिल्याने क्रुरतेची परिसीमा त्यांनी गाठली होती. अशात कुत्र्यांनी संधी साधत तिच्या हाताला आणि पायाचा चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.
ही संतापजनक घटना घडल्यानंतर पोलीसांच्या तपासात आई-वडील दोघेही बाळाला फेकण्यासाठी जात असतांनाचा सीसीटीव्ही समोर आल्याने कारवाईची मागणी होत असून बाळाच्या अवस्था ऐकून नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Nashik, Police