Home /News /maharashtra /

धक्कादायक! तब्बल 7 तास कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह होता घरात

धक्कादायक! तब्बल 7 तास कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह होता घरात

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    नाशिक, 22 जून: नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानं कोरोना संशयित महिलेचा मृतदेह चक्क नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तब्बल 7 तास महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या घरात होता. मात्र, महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानं मृतदेह पुन्हा ताब्यात घेतला आहे. या सगळ्या प्रकारामुळे सिव्हिल हॉस्पिटलचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हट्यावर आला आहे. हेही वाचा... शहरातील फुले नगर येथील 65 वर्षीय महिलेचा रविवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनानं महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नंतर महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर येताच हादरलेल्या हॉस्पिटल प्रशालनानं मध्यरात्री महिलेचा मृतदेह तब्बल सात तासांनी पुन्हा ताब्यात घेतला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडली आहे. परिसरातील नागरिक आणि मृत महिलेल्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. नाशिक शहरात सोमवारी नवे 78 कोरोनाबाधित रुग्ण आढळली आहेत तर दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1283 वर पोहोचली आहे. शहरातील पंचवटी, फुले नगर कोरोनाचे नवे हॉटस्फॉट म्हणून समोर आले आहेत. व्यापाऱ्यांनीच केले 'शटरडाऊन' राज्य शासनानं लॉकडाऊनचे नियम शिथिल करून बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी नाशिक शहरातील व्यापाऱ्यांनी मात्र स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन सुरू केला आहे. त्यामुळे प्रशासनविरुद्ध व्यापारी हा नवा संघर्ष सुरू झाला. नाशिक शहरातील प्रमुख बाजारपेठेत सर्व व्यवहार बंद असल्यानं अक्षरशः शुकशुकाट पसरला आहे. खरं तर हे मार्केट बंद प्रशासनानं केले नाही. तर थेट सर्व व्यापारी संघटनांनी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 दिवसांपूर्वी याच बाजारपेठेत सर्व दुकानं खुली असल्यानं प्रचंड गर्दी होती. पण शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आता हाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यापारी संघटना एकत्र आल्या आहेत. प्रशासन मात्र दुकानं उघडी ठेवली पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे. पण, व्यापारी संघटनेनं त्यांच्या या भूमिकाला विरोध केला आहे. आता तर, 'दुकानं उघडा नाहीतर गुन्हे दाखल करू' असा इशाराच नाशिक प्रशासनाने दिला आहे. मात्र, काहीही झालं तरी गर्दी रोखण्यासाठी, व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. हेही वाचा... राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरू राज्यात कोरोनाच्या 3870 नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज 1591 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 65 हजार 744 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
    First published:

    Tags: Corona, Corona virus, Coronavirus, Nashik news

    पुढील बातम्या