• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Nashik news : बेड मिळत नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण पोहोचला थेट महापालिकेत!

Nashik news : बेड मिळत नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण पोहोचला थेट महापालिकेत!

Nashik Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं समोर येत आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना वाट पाहावी लागत आहे. नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर आहे. ऑस्किजन बेड मिळत नसल्याने कोरोना रुग्णाला थेट महापालिका प्रवेशद्वारावर आणलं.

  • Share this:
नाशिक, 31 मार्च:  राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं समोर येत आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना वाट पाहावी लागत आहे. नाशिकमध्येही (Nashik) कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर आहे. ऑस्किजन बेड (Oxygen Bed) मिळत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णाने ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन थेट महापालिकेच्या (nashik municipal corporation) आवारात ठिय्या मांडला. नाशिकच्या सिडकोतील एका रुग्णाला तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र प्रकृती खालावली असूनही त्यांना बेड मिळत नव्हता. लोकप्रतिनिधींही त्यांना बेड मिळावा यासाठी खासगी रुग्णालयांना विनंती केली मात्र त्यांनाही दाद मिळेना. अखेर रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने रुग्णाला घेऊन थेट महापालिकेचं राजीव गांधी भवन प्रवेशद्वार गाठलं. त्यानंतर खडबडून जागं झालेल्या प्रशासनाने त्यांना नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Nagpur news: नागपुरातील कोरोना रुग्णांची भयंकर अवस्था; रुग्णालयातील भयावह PHOTO आले समोर

नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात अनेक खासगी रुग्णालयं बेड असूनही नसल्याचं कारण पुढे करत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी धावाधाव करावी लागत आहे. 'कोविड झाल्यापासून मला सगळं उलटं दिसतंय', कार्तिक आर्यनने शेअर केला PHOTO शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. त्यात एखाद्या रुग्णाची बिकट झाली तर मात्र बेडसाठी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न पडतो. जर स्थिती अशीच राहिली तर मात्र येण्याऱ्या काळात रुग्णांची अवस्था आणखी बिकट होईल.
Published by:News18 Digital
First published: