अरे बाप रे! सडके बटाटे आणि रंगीत पाणी.... गाडीवरची पाणीपुरी तोंडात घालण्यापूर्वी जरा हे वाचा

अरे बाप रे! सडके बटाटे आणि रंगीत पाणी....  गाडीवरची पाणीपुरी तोंडात घालण्यापूर्वी जरा हे वाचा

पाणीपुरीचे शौकिन असाल, तर गाडीवर उभं राहून पाणीपुरी खाण्याआधी जरा ही बातमी वाचा.

  • Share this:

नाशिक, 7 फेब्रुवारी : पाणीपुरीचे शौकिन असाल, तर गाडीवर उभं राहून पाणीपुरी खाण्याआधी जरा ही बातमी वाचा. पाणीपुरीसाठी कुठल्या पद्धतीचं साहित्य वापरलं जातंय, त्याचा दर्जा काय याचा एकदा विचार करा. विक्रेत्याने पाणीपुरीसाठी अस्वच्छ भांडी किंवा दूषित पाणी वापरल्याच्या बातम्या येत असातात, आता त्यात भर पडली आहे निकृष्ट साहित्याची. असं एक प्रकरण नुकतंच नाशिकमध्ये समोर आलं आहे. दररोज संध्याकाळी पाणीपुरी खायला झुंबड उडते अशा गाडीवर ही पाणीपुरी तयार करण्यासाठी चक्के सडके बटाटे, रंग घातलेल्या चटण्या आणि उघड्यावर वाळत घातलेल्या पुऱ्या वापरण्यात येत होत्या. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या पाणीपुरीवाल्याकडचं हे निकृष्ट दर्जाचं सामान जप्त केलं आहे.

खरं तर नाशिक महापालिकेची स्वच्छता अभियानाअंतर्गत सर्वेक्षण मोहीम सुरू होती. त्या वेळी सातपूर विभागात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी स्वच्छचेबाबत सर्वेक्षणासाठी गेले असताना त्यांना दिवाण सिंह नावाच्या पाणीपुरी विक्रेत्याचं पितळ उघडं पडलं. तो पाणीपुरीसाठी अक्षरशः फेकून दिलेले सडके बटाटे वापरत होता. पाणीपुरीची चटणी म्हणजे रंग घातलेलं गोड पाणी होतं आणि पुऱ्याही गाडीवर येण्यापूर्वी अत्यंत अस्वच्छ वातावरणात उघड्यावरच पडलेल्या होत्या. हे सगळं पाहून महापालिकेनं त्वरित कारवाई करत हे निकृष्ट साहित्य जप्त केलं. शिवाय या विक्रेत्याला दंडही केला.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या दर्जाविषयी तपासणी होते का, नागरिकांच्या जिवाशी खेळ होत असताना अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी काही कारवाई का करत नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

उघड्यावरची पाणीपुरी खाताना जपून, खातरजमा करूनच घ्या, असं आवाहन आता मनपातर्फे करण्यात येत आहे.

----------------------------------

अन्य बातम्या

'रोझ डे'च्या दिवशी पोलिसांची कारवाई, लॉजमध्ये पकडली 13 कॉलेजमधील जोडपी

Valentines Day ला डेटिंगवर जाताय, 'या' गोष्टी टाळा नाहीतर घोळ होईल

कॅन्सरपासून तुम्हाला संरक्षण देतील 'हे' सुपरफूड

पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जात आहात, ‘या’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

 

First published: February 7, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या